arrested
arrested 
पश्चिम महाराष्ट्र

श्रीरामपूरची इराणी टोळी दिल्लीत जेरबंद

सकाळवृत्तसेवा

श्रीरामपूर (नगर) : नाशिकसह राज्यात, परराज्यात गंठणचोरी करणाऱ्या व पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फसविणाऱ्या श्रीरामपूरच्या टोळीला दिल्लीतून अटक करण्यात नाशिक पोलिसांना यश आले. त्यांच्या अटकेमुळे सहा गुन्ह्यांची उकल झाली असून, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-1 ने घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद केली. मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी टोळीतील तिघांना घेऊन पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी व त्यांचे पोलीस पथक जयपूर मार्गे दिल्लीकडे जात होते. त्यादरम्यान त्यांना गंठणचोरी करणारी व पोलीस असल्याची बतावणी करून फसविणारी टोळी चोरीसाठी दिल्लीकडे जात असल्याची बातमी मिळाली. या पथकाने सापळा रचून बुधवारी, 7 फेब्रुवारीला श्रीरामपूर येथील सलीम नूरअली इराणी (40), कंबर शाहजान जाफरी (32), रियाज फैयाज इराणी (38), राज पोलीद इराणी (34) व पुण्याजवळील लोणी काळभोर येथील महंमद अजिज जाफरी (34) यांना ताब्यात घेतले.

या पाचजणांना आणण्यासाठी दुसरे पथक नाशिकहून पाठविण्यात आले. त्यांनी या टोळीला अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी म्हसरूळ व इंदिरानगरला प्रत्येकी दोन, आडगाव व गंगापूरला प्रत्येकी एक गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 13 तोळे सोने, स्वीफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT