पश्चिम महाराष्ट्र

जेलमधील आरोपींवर आता "टेलिमेडिसीन'उपचार 

हेमंत पवार

कऱ्हाड  - शासकीय रुग्णालयांत उपचार घेत असताना आरोपी किंवा संशयित पळून जाणे, आजारी नसतानाही काही वेळेस आरोपी विश्रांतीसाठी खोटी कारणे सांगून रुग्णालयात दाखल होणे अशा गैरप्रकारांना चाप लावून त्यांना जेलमध्येच उपचार मिळावेत व या सर्व कटकटी दूर व्हाव्यात यासाठी आता "टेलिमेडिसीन'चा पर्याय शोधण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आरोपी, संशयित पळून जाण्यासारखे प्रकार थांबून त्यांना आवश्‍यकतेनुसार आता जेलमध्येच उपचार मिळण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. 

अनेक कारणांमुळे गुन्हे दाखल असणाऱ्यांची जेलमध्ये गेल्यावर प्रकृती बिघडते. काही संशयित हे आजारी असल्याने त्यांना सातत्याने उपचाराची गरज असते. त्याचबरोबर काही जण तेथे गेल्यावर आजारी पडतात. त्याचा विचार करून जेलमधून संबंधित संशयित किंवा आरोपींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले जाते. आजाराच्या स्वरूपावरून संबंधितांना उपचारासाठी काही दिवस ठेवले जाते तर काहींना तातडीने उपचार करून जेलमध्ये पाठवले जाते. अनेकदा उपचार सुरू असताना काही गैरप्रकार घडतात. त्याचबरोबर काही वेळेस संशयित किंवा आरोपी पळून जाण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांची भंबेरी उडते. त्यांना संबंधितांच्या शोधासाठी मोठी मोहीम राबवावी लागते. त्यामुळे संबंधितांना जेलमध्ये गरजेपुरते उपचार मिळाले तर अशा गैरप्रकारांना चाप बसेल, या हेतूने शासकीय रुग्णांलयामार्फत आता जेलमध्ये "टेलिमेडिसीन'ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्यांना गरज आहे, त्यांना जेलमध्येच औषधोपचाराच्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयांत उपचार घेत असताना आरोपी किंवा संशयित पळून जाणे, आजारी नसतानाही काही वेळेस आरोपी विश्रांतीसाठी खोटी कारणे सांगून रुग्णालयात दाखल होणे अशा गैरप्रकारांना चाप बसून पोलिसांना लागणारे अतिरिक्त काम कमी होण्यास मदत होणार आहे. 

...अशी होते कार्यवाही  
जेल प्रशासनाकडून ज्या आरोपींना किंवा संशयितांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे, त्याची माहिती शासकीय रुग्णालयात कळवली जाते. त्यानंतर जेल प्रशासनाच्या सोयीनुसार "टेलिमेडिसीन' यंत्रणेव्दारे शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय अधिकाऱी संबंधितांशी बोलून त्यांच्या आजाराविषयी माहिती घेतात. त्यानंतर रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी तेथे जावून संबंधित आरोपी किंवा संशयितांना औषधे देतात. त्याचबरोबर ज्यांना दाखल करावयाची गरज आहे, त्यांना दाखल करण्याची मुभा यामध्ये देण्यात आली आहे. 

आरोपींची ने-आण बंद  
आरोपींना किंवा संशयितांना रुग्णालयात उपचारास नेण्यासाठी पोलिसांना संबंधितांच्या गाडीची व्यवस्था करण्यासह अन्य काही उपाययोजना कराव्या लागतात. आता जेलमध्येच "टेलिमेडिसीन'ची सोय उपलब्ध झाल्यामुळे आरोपींची ने-आण बंदच झाली असून, त्यामुळे आरोपी पळून जाण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. 

""जेलमधील आरोपींसाठी जेल प्रशासनाच्या सहकार्याने "टेलिमेडिसीन'व्दारे उपचार पध्दती सुरू करण्यात आली आहे. तेथील आरोपींच्या आजाराची माहिती या यंत्रणेव्दारे घेऊन ज्यांना दाखल करण्याची गरज नाही, त्यांना जेलमध्येच वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार देण्याची व्यवस्था  करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींची ने-आण करण्यासह अन्य गैरप्रकारांना आळा बसेल.'' 

-डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT