Dr. Kotnis
Dr. Kotnis 
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. कोटणीसांप्रती आंध्र-तेलंगणाची 'कृतज्ञता' 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याची माहिती असणाऱ्या धड्यांचा समावेश आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारने शालेय अभ्यासक्रमात केला आहे. 

आठवीच्या वर्गासाठी "कृतज्ञता' या पुस्तकाच पहिलाच धडा डॉ. कोटणीसांवर आहे. त्यांच्या कार्याच्या माहितीसह त्यांच्या जीवनावर आधारित निघालेला "डॉ. कोटणीस की अमर कहानी' या चित्रपटाच्या पोस्टरचाही धड्यात समावेश आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात डॉ. कोटणीस व त्यांचे कार्य उपेक्षितच राहिले आहे. 

"दुसऱ्यासाठी जगा...' ही हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती. त्याला अनुसरून सर्व सुखांचा त्याग करून आपले जीवन चिनी लोकांसाठी समर्पित केलेले आणि मूळचे सोलापूरचे असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस. त्यांच्या कर्तृत्वाचे कायम स्मरण होत राहावे, यासाठी महाराष्ट्र शासनासह महापालिकेनेही जागरूक राहणे अपेक्षित होते. मात्र, दोन्ही स्तरावर डॉ. कोटणीसांच्या कार्याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सेवाभावी वृत्तीने केलेल्या कार्याची स्मृती अंतःकरणपूर्वक पिढ्यान्‌पिढ्या कशी जपली जाते, याचा अनुभव डॉ. कोटणीस कुटुंबीयांना आजही चीनमध्ये येतो. त्याचवेळी, भारतात मात्र डॉ. कोटणीसांच्या कर्तृत्वाची पुरेशी दखल घेतली गेली नसल्याची खंत व्यक्त होते. डॉ. कोटणीसांचे कार्य पडद्याआड जाऊ नये यासाठी येथील प्रा. गणेश चन्ना यांनी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. 

डॉ. कोटणीस यांचे नाव सांगितल्यावर चिनी वकिलातीचे उच्चायुक्त बैठक सोडून मला भेटायला आले. इतकेच नव्हे तर चीनच्या शिक्षणमंत्र्यांशी भेटही घडवून दिली. यावरूनच डॉ. कोटणीसांनी चीनमध्ये किती अलौकिक कार्य केले असेल, याची प्रचिती येते. आपल्याकडे मात्र डॉ. कोटणीस उपेक्षित राहिले याची खंत आहे. 
- प्रा. गणेश चन्ना, अभ्यासक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT