Marathi News Solapur News Drone Camera irrigated area on the Ujni dam
Marathi News Solapur News Drone Camera irrigated area on the Ujni dam  
पश्चिम महाराष्ट्र

ड्रोनद्वारे निश्‍चित होणार उजनीवरील क्षेत्र? 

संतोष सिरसट

सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर किती क्षेत्र सिंचनाखाली आहे. याचा निश्‍चित आकडा अद्यापही कोणत्याच यंत्रणेकडे नाही. असे असले तरी उजनी धरणावर सिंचनाचे क्षेत्र किती आहे? हे शोधणे आता शक्‍य होणार आहे, तेही ड्रोनच्या सहाय्याने. येत्या महिनाभरात हे क्षेत्र निश्‍चित होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे. उजनीमुळे सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यांना फायदा झाला आहे. यामुळे राज्यात सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची नोंद झाली आहे. उसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले आहे. 

धरणातून खरीप व रब्बी या दोन्ही हंगामासाठी पाणी सोडले जाते. या पाण्यावर शेतकरी पिके घेतात. जिल्ह्यात वाढलेल्या ऊस क्षेत्राला धरणच कारणीभूत आहे. एकीकडे सिंचनाखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे धरणातील पाण्याच्या साठवण क्षमतेमध्ये गाळामुळे घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. धरणाचे पाणी आहे म्हटल्यावर त्या पाण्याचा वापर योग्य प्रकारे करण्याकडेही दुर्लक्ष केले जाते. एवढेच नाही तर पाणी मागणी अर्ज भरण्याकडेही शेतकरी लक्ष देत नाहीत, हे दुर्दैवाचेच म्हणावे लागेल. तरीही, ठरलेल्या नियोजनाप्रमाणे धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते. एखाद्या शेतकऱ्याने सिंचनाखालील क्षेत्र एक एकर दाखवले असले तरी प्रत्यक्षात त्याचे क्षेत्र तीन ते पाच एकर एवढे असते. त्या क्षेत्रासाठीही धरणातील पाण्याचा वापर केला जातो. मात्र, कागदोपत्री ते क्षेत्र दाखविले जात नाही. पाण्याचा वापर होतो. मात्र, क्षेत्रच योग्य दाखविले नसल्याने त्याचा फटका पाटबंधारे विभागाला बसतो. त्याचबरोबर अनेकवेळा कालव्याचे पाणी वापरूनही माझे पीक विहिरीवरील पाण्यावर घेतल्याचे सांगण्याचा प्रयत्न अनेकांकडून होतो. या सगळ्या प्रकारामुळे धरणावरील निश्‍चित सिंचित क्षेत्र किती? याचा अंदाजच येत नाही. हे टाळण्यासाठी आता या क्षेत्राची मोजणी ड्रोनच्या सहाय्याने होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे किती हेक्‍टर अनधिकृत क्षेत्राला धरणातून पाणीपुरवठा होतो, हेही निश्‍चित होईल. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी, ड्रोनद्वारे होणाऱ्या मोजणीमुळे लाभ क्षेत्राची पिकरचना व व्याप्ती निश्‍चित होईल. व्याप्ती निश्‍चित झाल्यानंतर आकारणी वाढेल. आकारणी वाढल्यानंतर साहजिकच वसुली वाढण्यास मदत होईल. आकारणी करण्याची प्रक्रिया वेळेत होईल, अशी माहिती दिली. 

ड्रोनचा हेक्‍टरी खर्च 158 रुपये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने उजनीवरील सिंचन क्षेत्राची मोजणी ड्रोनच्या सहाय्याने होण्याची शक्‍यता आहे. एक हेक्‍टर क्षेत्राची मोजणी करण्यासाठी ड्रोनला अंदाजे 158 रुपये खर्च येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT