Marathi News Solapur news sezeryan Hospital government
Marathi News Solapur news sezeryan Hospital government  
पश्चिम महाराष्ट्र

सिझेरियन प्रसुतींवर शासनाची नजर

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : राज्यातील खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसूती संख्या वाढत आहे. यात आर्थिक हितसंबंध असल्याची शक्‍यता लक्षात घेऊन
शासनाने रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीवर नजर ठेवणार आहे. सिझेरियन प्रसूती संदर्भातील निकषानुसार शासनास मार्गदर्शक सूचनांची शिफारस करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसुतींची संख्या अधिक आहे. यामुळे माता व बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतात, तसेच त्यामागील आर्थिक हितसंबंध असण्याची शक्‍यता असते. या सर्व बाबींचा विचार करून सिझेरियन प्रसूती संदर्भातील तपशील जाहीर करण्यास बंधनकारक करणे, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया जिथे जास्त झाल्या त्या रुग्णालयांची चौकशी करणे आदींवर शासनाचे आरोग्य विभाग काम करणार आहे.

यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यासाठी सुबर्णा घोष यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती. या विनंतीचा
विचार करून सी सेक्‍शन प्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार
नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करून शासनास शिफारस करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने समितीची स्थापना केली आहे.
या समितीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक हे या समितीचे अध्यक्ष
असणार आहेत. तसेच या समितीत आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक, राज्यातील विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. रेखा डावर यांच्यासह अन्य दोन तज्ञ, सुबर्णा घोष व निदा हसन, युनिसेफने निर्देशित केलेला प्रतिनिधी, स्त्री रोग व
प्रसुतीशास्त्र तज्ञ संघटना (एफओजीएसआय) या व्यावसायिक संघटनेने
निर्देशित केलेला प्रतिनिधी, कुटुंब कल्याण संचालनालयाचा संचालक किंवा
उपसंचालक यांचा समावेश आहे. समितीच्या अध्यक्षांकडे सचिवांशी सल्ला मसलत करून स्त्री रोग तज्ञ व प्रसूतीशास्त्र तज्ञ यांची नियुक्ती करण्याचा अधिकार असणार आहे. या समितीचा कार्यकाळ हा तीन महिन्याचा असणार असून कालावधी संपण्यापूर्वी समिती अहवाल सादर करणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT