marathi news solapur standing committee
marathi news solapur standing committee  
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर स्थायी समितीच्या सोळा सदस्यांनी ठेवले 'देव पाण्यात'

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य उद्या (शनिवारी, ता. 3 फेब्रु.) चिठ्ठीद्वारे बाहेर पडणार आहेत. आपल्या नावाची चिठ्ठी निघू नये, यासाठी सर्वच 16 सदस्यांनी आपले 'देव पाण्यात' ठेवले आहेत. माझी चिठ्ठी निघाली तरी चालेल, शेवटी नशिबाचा खेळ, असे काही सदस्य म्हणत असले तरी मनोमन मात्र चिठ्ठी निघू नये हीच त्यांची इच्छा असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. पुर्वनियोजनानुसार 'चिठ्ठी' काढण्याचा मुहूर्त आज (शुक्रवारी, ता. 2 फेब्रु.) होता. मात्र हा दिवस 'घात'वार असल्याचा साक्षात्कार काही जणांना झाला आणि आग्रहपूर्वक चिठ्ठीचा विषय 'अजेंड्या'वरुन बाजूला काढण्यात आला. 

शनिवारी (ता.3) चतुर्थी आहे, हा दिवस आपल्यासाठी शुभ असेल या उद्देशाने याच दिवशी सभा काढली. काही जणांनी गणरायाला साकडे घालण्याचीही तयारी केली आहे. पाठोपाठ दोन दिवस स्थायी समितीची सभा काढण्याची वेळ प्रशासनावर पहिल्यांदाच आल्याचे सांगण्यात आले. महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे निश्‍चित केले जातात. फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही चिठ्ठीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही सभा बोलावण्यात आली आहे. 

स्थायी समितीमध्ये सभापती संजय कोळी, श्रीनिवास करली, नागेश वल्याळ, रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, मनिषा हुच्चे, राजेश्री बिराजदार, मीनाक्षी कंपल्ली (भाजप), महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर व विठ्ठल कोटा (शिवसेना), प्रवीण निकाळजे व नरसिंग कोळी (काँग्रेस), आनंद चंदनशिवे (बहुजन समाज पक्ष), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि तस्लीम शेख (एमआयएम) हे सदस्य आहेत. त्यापैकी आठजणांची चिठ्ठी निघेल. 

आकडे बोलतात, असे आहे पक्षीय बलाबल.. 
भाजप - 08 
शिवसेना - 03 
काँग्रेस - 02 
राष्ट्रवादी काँग्रेस- 01 
बसप - 01 
एमआयएम - 01 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT