mohol
mohol 
पश्चिम महाराष्ट्र

गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्वभूमीवर मोहोळमध्ये पोलिसांचे संचलन

चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) : गणेशोत्सव व मोहोरम या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलिसांनी शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी संचलन केले. या उत्सवाच्या काळात जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्याला कायद्याचा चांगलाच बडगा दाखविला जाईल असे ही यावेळी पोलिस निरिक्षक कोकणे यांनी सांगितले.                        

यावर्षी शहरासह तालुक्यात एकूण 88 गणेश मंडळांनी आतापर्यंत नोंदणी केली असून चालू वर्षी तालुक्यात 50 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविली जात आहे. शहरात 25 गणेश मंडळानी गणेशाची स्थापना केली आहे. गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक सूर्यंकांत कोकणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा पोलीस उपाधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 अधिकारी,  70 पोलिस कर्मचारी, 20 होमगार्ड, 150 पोलीस मित्रांची नेमणूक केली आहे.

गणेशोत्सव व मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर सी. आर. पी. सी. 107  सेक्शननुसार 108 लोकावर कार्यवाही, 144 नुसार, 38 जणांवर, 151, 3 नुसार दोघाजणांवर, अशा एकूण 148 जणांवर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तर तडीपारीचे सात प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या संचालनामध्ये पोलिस निरिक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षिक विक्रांत बोधे, अन्वर मुजावर, इंद्रजित सोनकांबळे, अतुल भोसले, नितीन थेटे यांच्यासह सर्व पोलीस, होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT