congress distribute meal.jpg
congress distribute meal.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कॉंग्रेसतर्फे राबणाऱ्या हातांना जेवण वाटप 

सकाळवृत्तसेवा

सांगली- "कोरोना' चा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. महापालिका प्रशासनातर्फे दिवसभर स्वच्छता मोहिम आणि औषध फवारणी सुरू आहे. 20 प्रभागात दिवसभर राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॉंग्रेस पक्षातर्फे आज जेवण देण्यात आले. 


महापालिका क्षेत्रातील सर्व 20 प्रभागात स्वच्छता कर्मचाऱ्यांना कॉंग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जेवणाच्या पाकीटाचे वाटप केले. तसेच मिरजेत पोलिसांना जेवणाची पाकिटे दिली. सांगलीत प्रभाग 9 मध्ये नगरसेवक संतोष पाटील, मनगू सरगर, मदिना बारुदवाले आदी उपस्थित होते. प्रभाग 17 मध्ये नगरसेवक दिग्वजय सूर्यवंशी, मृणाल पाटील आदींनी जेवण वाटप केले.बसस्थानकाजवळ युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, आरती वळवडे, रविंद्र वळवडे, सचिन घेवारे, मौला वंटमुरे आदींनी कर्मचाऱ्यांना जेवण दिले. 


प्रभाग 16 मध्ये विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी महापौर हारुण शिकलगार, बिपिन कदम, बटू घोडके यांनी, कुपवाडमध्ये मुश्‍ताक रंगरेज, सनी धोत्रे, कुमार पाटील यांनी, प्रभाग 8 नगरसेवक विष्णु माने, अश्विन पाटील, रवी खराडे, प्रशांत देशमुख आदींनी, प्रभाग 18 मध्ये नगरसेवक अभिजित भोसले, सभापती स्नेहल सावंत, सचिन सावंत, ज्योती आदाटे, ताजुद्दीन तांबोळी यांनी जेवण दिले. प्रभाग 19 अजय देशमुख, राहुल जाधव, सुभाष चिकोडीकर, गजानन मिरजे, नगरसेविका शुभांगी साळुंखे, अमर निंबाळकर, शेवंता वाघमारे, राजू मुळीक, इरफान मुल्ला, प्रमोद सूर्यवंशी, शीतल सदलगे यांच्याहस्ते जेवण पाकिटे दिली. 
मिरजेत शहराध्यक्ष संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात, अभिजीत हारगे, शमशोदीन सय्यद, निरंजन आवटी, चंद्रकांत आंबी, सचिन जाधव, अजित दोरकर, डॉ. राजेंद्र मेथे, आयुब निशाणदार आदींच्या हस्ते पोलिस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना जेवण दिले. 
 

त्यामुळेच शहर कोरोनामुक्त- 
महापालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक आदी टीमचा राबता सुरू आहे. त्यामुळेच महापालिका क्षेत्र "कोरोना' मुक्त राहिले असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT