Milk
Milk 
पश्चिम महाराष्ट्र

#MilkAgitation दुधाच्या टॅंकरसाठी पोलिसांचा पहारा

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - जिल्ह्यातील जनता झोपेत असताना जिल्हा पोलिस दलातील ३०० हून अधिक जवान मात्र रात्रभर मुसळधार पावसात पुणे- बंगळूर महामार्गासह अन्य मार्गावर गस्त घालून दूध वाहतूक करणाऱ्या टॅंकरना सुरक्षा देत मुंबईकडे रवाना करत होते. शहरवासियांना दूध मिळावे या बांधिलकीतून त्यांनी रात्रीचा दिवस केला.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये वाढवून मिळावेत, या मागणीसाठी कालपासून (ता. १६) दूध दराचे आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे शहराला दूध पुरवठा होणार, की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, कोणत्या परिस्थितीत दूध पुरवठा सुरू राहिला पाहिजे या शासनाच्या सूचनेप्रमाणे पोलिसांनी जबाबदारी स्वीकारून कार्यवाही सुरू केली. 

मुसळधार पावसाचा सामना करत काल रात्रभर पोलिसांनी दूध वाहतूक करणाऱ्या टॅंकरना जागता पहारा दिला. जनतेला आज सकाळी दूध पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा पोलिस दलाचे ३०० हून अधिक पोलिस कर्मचारी व अधिकारी २४ तास ऑनड्युटी होते. त्यांच्याद्वारे रात्रभर मुसळधार पावसातही पुणे- बंगळूर महामार्गासह अन्य मार्गावर गस्त घालून टॅंकर मुंबईकडे रवाना करण्यात येत होते. अनेक ठिकाणी महामार्गावर पोलिसांनी पॉइंट करून कर्मचारी तैनात केले आहेत. दूध आंदोलनाची तीव्रता विचारात घेऊन पोलिसांकडून बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात येत आहे. शस्त्राने सुसज्ज असलेल्या या जवानांना पोलिसांबरोबर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात ११ टक्केच दुधाचे संकलन
सातारा जिल्ह्यात प्रतिदिन एक वेळेचे १५ लाख ४९ हजार लिटर दूध संकलन होते. त्यापैकी आज सकाळी एक लाख ७७ हजार ४०० लिटर म्हणजे ११.४४ टक्केच दूध संकलन झाले. दरम्यान, काल (ता. १६) जिल्ह्यात २५ लाख लिटर दूध संकलनापैकी तीन लाख ९६ हजार लिटर दूध संकलन झाले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांश संस्थांकडून प्रतिसाद मिळत असल्याने संकलन कमी होत आहे. शेतकरी स्वयंस्फूर्तीने दूध डेअरी घालत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT