mohol
mohol 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांने दुधाने केली अांघोळ

राजकुमार शहा

मोहोळ : हॉटेलवाले मालक खवा घेता का खवा ही आर्त विनवणी आहे, दुध दर वाढीच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्याची गेल्या आठवड्यापासुन दुध दराच्या अंदोलनामुळे दुध कोणाला द्यावयाचे या अडचणीमुळे शेतकऱ्याने खवा करणे सुरू केले आहे. मात्र एरव्ही दोनशे ते अडीचशे रुपये किलो असणारा खवा सध्या सत्तर ते ऐंशी रुपये किलो दराने व्यावसायिकांना तो ही मस्का लावून मातीमोल दराने द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुर्ण अार्थिक नियोजन कोलमडले आहे. दुधाची विल्हेवाट म्हणुन पापरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी दुधाने अांघोळ सुरू केली आहे.

दुध दर वाढीसाठी गेल्या आठवड्यापासून विविध शेतकरी संघटनांनी सरकारच्या विरोधात अांदोलन सुरू केले आहे. त्यामुळे दुध संकलन ठप्प झाले आहे. दुधाला दर नाही संकलन नाही. खव्याला दर नाही अशा विचित्र त्रिकोणात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. एक किलो खवा करावयास गायीचे किमान पाच लिटर दुध लागते. सध्याच्या आठरा रुपये प्रती लिटर दुधाचा भाव धरला, तर नव्वद रुपये दुधाचेच होतात. त्यासाठी लागणारे सरपण शारीरीक कष्ट या सर्वांचा हिशोब घातला तर खवा शंभर ते एकशे दहा रुपये किलो बसतो. त्याचे व्यवस्थित पॅकींग करावयाचे व तालुक्याच्या ठिकाणी विक्रीस घेऊन जायचा. मोठया हॉटेल व्यावसायिकांच्या दारात जाऊन त्याला खवा घेता का म्हणून विचारायचे. त्याने खवा पाहायचा व पातळच आहे पिवळाच आहे क्वालिटीच नाही असे फाटे फोडावयाचे व शेवटी नको म्हणुन सांगावयाचे. त्यामुळे निराश होऊन दुसरा हॉटेल मालक शोधायचा व त्याच्या दारात ही पाहिल्या सारखीच परिक्षा द्यावयाची त्याच्या मर्जीच्या दराने शेवटी खवा दयावयाचा आलेल्या तुटपुंज्या पैशातुन प्रपंचासाठी जाताना किराणा बाजार न्यावयाचा असा दिनक्रम सध्या ग्रामिण भागातील शेतकऱ्यांचा आहे. लवकर या वर तोडगा निघावा अशी केवीलवाणी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सध्याच्या खव्याला क्वालिटी नाही, कायमचा खवा वेगळा व आताचा वेगळा गिऱ्हाईकाला तो चालत नाही.
- बाळासाहेब नायकोजी ( गवळी ) हॉटेल व्यावसायीक मोहोळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT