minister do agitation for road
minister do agitation for road 
पश्चिम महाराष्ट्र

रस्ता न झाल्यास सहकारमंत्री करणार उपोषण

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांसाठी रस्ता करून न दिल्यास महापालिकेत उपोषणाला बसण्याचा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. त्यासाठी 15 ऑक्‍टोबरपर्यंतची मुदतही दिली.

या परिसरात चारही बाजूंनी बांधकामे झाली आहेत. या अपार्टमेंटमधील नागरिकांना रहदारीसाठी रस्ता नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या संदर्भात देशमुख यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्या वेळी देशमुख यांनी महापालिकेतील नगरअभियंता व बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अनेक वर्षांपासून या ठिकाणी रस्त्याची मागणी असतानाही त्याची पूर्तता का केली नाही, असा प्रश्‍न उपस्थित करीत सर्वांना फैलावर घेतले.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मी भाजपचा असलो तरी नागरिकांचे प्रश्‍न सोडविणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत या रस्त्याचे काम 15 ऑक्‍टोबरपूर्वी झालेच पाहिजे, अशी सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. शासकीय विश्रामधाममधील कक्षात अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत, रस्त्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण झाले नाही, तर महापालिकेत बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असेही देशमुख म्हणाले. दरम्यान, या ठिकाणी झालेली बांधकामे हा परिसर महापालिका हद्दीत समाविष्ट होण्यापूर्वी झालेली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता करता येईल की नाही, याबाबत तपासणी करावी लागेल, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे सध्या स्पेन दौऱ्यावर आहेत. ते सोलापुरात आल्यावर या संदर्भातील प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर आयुक्त निर्णय देतील, त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT