रेल्वे
रेल्वे  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरज : कोयना, महालक्ष्मी विजेवर कधी धावणार?

सकाळ वृत्तसेवा

मिरज: मिरज-पुणे या २८० किलोमीटर विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर असलेतरी अद्यापही काही तांत्रिक कामे प्रलंबित असल्यामुळे सध्यातरी कोयना अथवा महालक्ष्मी एक्स्प्रेस विजेवर धावण्याची शक्यता कमी असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. लोंढा-मिरज-पुणे या मार्गाचे दुहेरी आणि विद्युतीकरणाचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. यामध्ये पूर्वीच्या जुन्या एकेरी मार्गाचे विद्युतीकरण पूर्णत्वाकडे आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे काही ठिकाणी विद्युतीकरणास विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे तुर्तासतरी गाड्या विजेवर धावण्याची शक्यता कमी आहे.

मिरज-पुणे विद्युतीकरण दरम्यान रेल्वे गेटवर ग्रील उभे करणे, विद्युत व्यवस्था, प्लॅंट उभारणीतील कामे पूर्ण झाली आहेत. पुणे विभागाकडून चालकांना विद्युत लोको चालविण्याचे प्रशिक्षण देऊन यंत्रणा सज्ज आहे. नुकतेच महाव्यवस्थापनकांनी दुहेरी आणि विद्युतीकरणाची पहाणी केली आहे; तर काही तांत्रिक कामांसह किरकोळ कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सध्या विजेवर कोणतीच गाडी धावणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. कऱ्हाड ते सातारा, पुणे दरम्यान काही ठिकाणी दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावर दोन्ही मार्गांनी गाड्या धावत आहेत; तर मिरज ते पुणे मार्गावर जुन्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पण काही तांत्रिक अडचणीमुळे विजेवर धावणाऱ्या गाड्यांना सध्यातरी रेल्वे प्रशासनाने लाल सिग्नल दिला आहे.

पुणे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिरज-पुणे मार्गावरील विद्युतीकरणाची पाहणी केली आहे; पण सध्यातरी एक्स्प्रेस गाड्या विजेवर सोडण्याचे आदेश नाहीत. काही तांत्रिक कामे पूर्ण केल्यानंतर लवकरच गाड्या विजेवर सुरू करण्याचे नियोजन केले जाईल.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT