पश्चिम महाराष्ट्र

बेपत्ता झालेला मुलगा परतला घरी

सकाळ वृत्तसेवा

मरवडे (सोलापूर) : मुलाने शिक्षण घ्यावे हा हट्ट धरणाऱ्या मरवडे (ता. मंगळवेढा) येथील शिवशरण कुटुंबातील सात वर्षांचा राज शिवशरण हा 'बा, मला शिकायचं नाय...' असे म्हणत बेपत्ता झाला होता. तो सांजवेळी घरी परतल्याने सकाळपासून त्याचा शोधत घेत असलेल्या मरवडेकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

दत्ता शिवशरण व पत्नी राधा यांचा मोलमजुरी करीत नेटका संसार सुरू आहे. त्यांची मुलगी अंगणवाडीत शाळेत जाते तर सात वर्षांचा मुलगा राज गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत शिक्षण घेत आहे. राज नेहमीच शाळेशी कट्टी करत खेळाशी गट्टी करीत शाळेत वेळोवेळी गैरहजर राहत असल्याचे एव्हाना शिवशरण कुटुंबाच्या लक्षात आले होते. गेल्याच पंधरवड्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी राज शाळेत येत नसल्याचे घरी येऊन सांगितलेही होते. गेला आठवडाभर शाळेत गेला नसल्याने त्याचे चुलते किरण शिवशरण यांनी राजला शाळेत जाण्याबाबत सांगितले. बा, मला शिकायचं नाय, काहीही झाले तरी शाळेत जाणार नाही असे म्हणत न जेवताच खेळायला जातो, असे सांगत सकाळीच राजने घर सोडले. 

11 वाजले तरी राज घरी आला नाही व शाळेतही गेलेला नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. दरम्यानच्या काळात घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिस ठाण्यानेही सतर्कता दाखवीत राजच्या तपासासाठी पथके रवाना केली. पोलिस पथकाबरोबर भीमराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू शिंदे, उपाध्यक्ष बाळू शेंबडे, मरवडे ग्रामपंचायतीचे गटनेते संजय पवार, प्रा. संतोष पवार यांच्याबरोबर सुमारे 200 मरवडेकरांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत विविध ठिकाणी शोध घेतला. शिवशरण यांच्या कुटुंबात तर पाहुणे-रावळे जमा होत एकच रडारड सुरू झाली. सांजवेळ होताच दिवसभर मरवडे परिसरातच लपून बसलेला राज शिवशरण मला आई-बाची लई आठवण येतीय असे म्हणत घरी दाखल झाला आणि साऱ्या मरवडेकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडत आनंद व्यक्त केला. 

आई बाबांचे स्वप्न पूर्ण करणार
शाळेत जा म्हणून सांगितल्याने मी दिवसभर लपून बसलो होतो. दिवसभर जेवलोही नाही. घरी आल्यानंतर आई-बाचे रडलेले चेहरे बघितले आणि मलाही रडू कोसळले. आता मी शिकूनशान मोठं होत आई-बाचे स्वप्न पूर्ण करणार. 
- राज शिवशरण, मरवडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT