mobile  Veterinarians will start in maharashtra
mobile Veterinarians will start in maharashtra 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रात फिरते पशुचिकित्सालय सुरू करणार : मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर : शेती व्यवसाय अडचणीत आहे, शेतकरी मर मर मरतोय. त्यासाठी पूरक म्हणून पशुधन जगवणे महत्त्वाचे आहे. पशुधन शेतकऱ्याचे कुटुंब आहे. ते टिकवण्यासाठी महाराष्ट्रात आम्ही फिरते पशुचिकित्सालय सुरू करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

येथील राजारामबापू दूध संघ कार्यस्थळावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्प व राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोगशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख, प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, उपस्थित होते. दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,""योग्य असे पशुखाद्य देण्यासाठी त्याचे चांगले उत्पादन घेणे गरजेचे आहे. तशी व्यवस्था राजारामबापू दूध संघात आहे. दूध संघातील अद्ययावत मशनरी, त्यांची स्वच्छता ही बाब प्रशंसनीय आहे. अद्ययावत यंत्रणा बघून मी थक्क झालो. लोकनेते राजारामबापू हे राजकारणातील विद्यापीठ होते. ते राजकारणात नेहमी नवनवे प्रयोग राबवत. त्यांचा वारसा जयंत पाटील नेटाने पुढे चालवत आहेत. आम्ही सहकार क्षेत्र मरू देणार नाही. गोरगरीब शेतकऱ्यांना पुढे नेण्याचे काम करू. शेतकऱ्यांचे हिताचे कार्यक्रम सुरू ठेवू. जे जे चांगले आहे ते टिकवणेच नाही तर ते वाढवणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे.''

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले,""शेतकऱ्यांच्या बरोबर दूध वितरकांचाही वाटा दूध संघात महत्त्वाचा आहे. विनायक पाटील व सर्व संचालकांनी दूध भुकटी प्रकल्प कमी कालावधीत पूर्ण केला. त्याचा दर्जा कायम ठेवण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न राहील.''

अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले,""सहकारातील बरेच दूध संघ बंद पडले. सहकार टिकवण्यासाठी अभ्यास कमिटी नेमावी व निर्णय घ्यावा. एका दुधावर किती वेळा ऑडिट फी भरावी त्याचाही विचार व्हायला हवा. सर्व तज्ज्ञ मान्यवरांची दूध समिती करावी व त्या माध्यमातून सहकारी दूध संघांचे प्रश्‍न सोडवावेत. दुधाला सबसीडी द्यावी.''

उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी आभार मानले. दूध संघाचे संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT