yashwant Mane
yashwant Mane 
पश्चिम महाराष्ट्र

मोहोळमध्ये आमदार यशवंत मानेंसमोर मोठी आव्हाने

राजकुमार शहा

मोहोळ : अत्यंत चुरशीने पार पडलेल्या मोहोळ विधानसभा निवडणुकीत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने हे भरघोस मताने निवडून आले असले तरी, त्यांच्यापुढे मतदार संघातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांच्या निवडीमुळे मतदार संघातील सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, आता आमदार माने यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा या ना त्या कारणावरून कायम चर्चेतला मतदारसंघ आहे. यापूर्वी 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रा. लक्ष्मण ढोबळे हे आमदार झाले होते. तर, 2014 च्या निवडणुकीत रमेश कदम हे निवडून आले होते. ढोबळे यांच्या कार्यकाळात बऱ्यापैकी विकास झाला, माजी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकाळात रस्ते, वीज, पाणी या दोन  महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य देऊन मोठा विकास केला. त्यामुळे आमदार माने यांचा बराचसा भार हलका झाला आहे. आज ही मतदारसंघात अनेक रस्ते ,पिण्याच्या पाण्याचे दूरभीक्ष  आहे. त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे.

सर्व विकास कामात मोहोळ शहराच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला आहे. आजही ऐन पावसाळ्यात मोहोळ शहर वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विरोधी पक्षाचे सरकार असूनही जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे , माजी आमदार रमेश कदम यांनी त्यांच्या कौशल्याने विकास निधी खेचून आणला, तोच पॅटर्न आता आमदार माने राबविणार, की वेगळे काही करणार हे थोड्या दिवसात लक्षात येणार आहे. मोहोळ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्सप्रेस ला दोन मिनिटांचा थांबा देणे हे अगदी साधे काम आहे.  माजी खासदार सुशीलकुमार शिंदे,माजी खा .शरद बनसोडे यांच्याकडे व्यापाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ढीगभर निवेदने दिली पण हा प्रश्न आजही प्रलंबित आहे. त्यामुळे माने यांच्यापुढे अशा एक ना अनेक प्रश्नांची मालिका आहे, त्यावर ते कशी मात करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मोहोळ विधानसभा मतदार संघातील 143 गावे केंद्रबिंदू मानून आमदार माने यांनी काम करणे गरजेचे आहे.

ही आहेत गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कामे - मोहोळ शहराला कायम  स्वरूपाचा पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणे.
- सुसज्ज असे सर्व सोयींनी युक्त ग्रामीण रुग्णालय व रक्तपेढी.
- सुसज्ज बस आगार व बस स्थानक पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारत व पोलिसांना राहण्यासाठी पोलिस वसाहत.
- गुन्हेगारीचा आलेख पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय.
- आष्टी व शिरापूर उपसा सिंचन योजना साठी निधीची उपलब्धता.
- बागायती क्षेत्र वाढल्याने शेतकऱ्यांची वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी विद्युत महापारेषणचे विभागीय कार्यालय.
- क्रीडा संकुल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT