मोहोळ : मोहोळ येथील सिने कलाकार अमोल महामुनी यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत. ते राहतात ती व परिसरातील गल्ली मधे डास निर्मुलनाची सुमारे पन्नास पाकीटे पावडर टाकुन डासमुक्त गल्ली हा उपक्रम राबविला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास उच्चाटन झाले आहे. नागरीकातून कार्याचे कौतुक होत आहे.
मोहोळ शहरात सध्या डेंगू, मलेरिया, चिकन गुनिया सदृष्य रोगाचे वातावरण आहे. अशी परिस्थिती असताना आपला वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन, स्वखर्चातून आपण राहत असलेल्या परिसरातील घाणीचे प्रमाण वाढले असल्याने व डेंगू, मलेरिया, चिकन गुनिया सदृष्य रोगांच्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एक सामाजिक बांधिलकी जपत महामुनी व त्यांच्या मित्रांनी नागरिकांचा आरोग्याचा विचार करून चाटी गल्ली, वाणी गल्ली, चारबाई बोळ, सोनार गल्ली, गुमते घाट, बागवान चौक व इतर परिसरामध्ये गटारी, दुर्गंध पसरलेल्या परिसरात रस्त्याच्या कडेने डास प्रतिबंधक पावडर टाकली आहे.
यामुळे डासाचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांमधून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने समाजाचे हिताचे कार्य केल्याने अमोल महामुनी मित्र मंडळाच्या कार्याची चर्चा संपूर्ण परिसरात आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बोराडे, राहुल तावसकर, लक्ष्मण पाटील, बंडू मोहरे, महावीर शहा, संदीप दीक्षित, अंबादास पवार, लल्या स्वामी, श्रीकांत पिलीवकर, शंकर माळी, गणेश गुरव, सचिन महामुनी, पिंटू भोयरेकर, गणेश सोधळ, संदेश सलगरकर व अमोल भैय्या महामुनी मित्र मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.