पश्चिम महाराष्ट्र

मुलाला वाचविताना शेततळ्यात बुडून आईचा मृत्यू 

दिलीप कोळी

विटा - शेततळ्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बलवडी ( खा.) येथे आज दुपारी पावणेएकच्या सुमारास घडली. अर्चना अर्जुन हिंगे ( वय ४५ ) असे त्यांचे नांव आहे. 

बलवडी येथील अर्चना हिंगे, त्यांची मुलगी पूजा व बारा वर्षाचा मुलगा हर्षद आज सकाळी अकराच्या सुमारास घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतात टोमॅटो बांधण्यासाठी गेले होते. अर्चना व त्यांची मुलगी टोमॅटो बांधण्यात व्यस्त असताना हर्षद हा शेतानजीक असणा-या शेततळ्याजवळ खेळत - खेळत गेला आणि शेततळ्यात पाय घसरून पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागल्याने तो ओरडू लागला. त्यावेळी त्याची आई अर्चना आरडाओरडा ऐकूण शेततळ्याजवळ आल्या. त्यांनी क्षणांचाही विलंब न लावता शेततळ्यात उडी घेतली. परंतु त्यांनाही पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. अर्चना यांची लहान मुलगी पूजा हिने हे दोघेजण बुडत असताना तिने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. त्यातील दोन लोकांनी मायलेकांना शेततळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले. परंतु शेततळ्यात दहा ते बारा फुट पाणी असल्याने त्यांना वर काढताना अडचणी येऊ लागली. मुलगा हर्षदला त्यांनी पाण्याबाहेर काढले. तोपर्यंत अर्चना या पाण्यात बुडल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT