पश्चिम महाराष्ट्र

खासदार धनंजय महाडिक यांची "ब्रेकफास्ट'पे चर्चा

सुधाकर काशिद

कोल्हापूर - निवडणूकीचा प्रचार म्हणजे त्यात वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब अपरिहार्य आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र "चायपे' चर्चा याच धर्तीवर "ब्रेकफास्ट'पे चर्चा असा एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. 

आज (मंगळवारी) कोल्हापूर महापालिके समोरील इंडिया हॉटेलमध्ये त्यांनी आज हा उपक्रम राबविला. ते या हॉटेल मधील पातळभाजी या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी आले. अर्थात हे एक निमित्त होते आणि त्यामागचे मुख्यकारण निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांशी ग्राऊंडलेवलवर चर्चा, गाठीभेटी हेच होते. आपल्या वेगळ्या चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या इंडिया हॉटेलमध्ये अर्थातच महाडिक यांच्या "ब्रेकफास्ट'पर चर्चेच्या निमित्ताने कार्यकर्ते व त्यांच्या मित्रपरिवाराची गर्दी झाली. पातळभाजीवर सर्वांनी ताव मारला आणि या निमित्ताने लोकसभा निवडणूकीचा पुढचा प्रचार किती चरचरीत आणि किती झणझणीत असणार याचा प्रत्यय महाडिक यांनी आणून दिला. 

यापूर्वीही महाडिक यांनी शिवाजी पेठेतील मिसळवर ताव मारला होता. त्याची जोरदार चर्चा रंगली होती. 

ब्रेकफास्ट पे चर्चा या निमित्ताने कोल्हापूर महापालिका परिसरातील जुने जानते मित्र, सहकारी, जेष्ठ नगरसेवक सर्व एकत्र आहे. या सर्वांनी एकत्र येऊन मला आगामी निवडणूकीसाठी पाठींबा दिला. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 
- धनंजय महाडिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT