पश्चिम महाराष्ट्र

महावितरण करणार कोरोनाच्या विजयोध्यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव 

संतोष सिरसट

सोलापूर ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात आपात्कालीन परिस्थितीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी अनेकांनी विशेष कामगिरी केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर येत्या स्वातंत्र्यदिनी विशेष गौरव करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना सुरु आहे. लॉकडाऊनच्या कालावधीपासून रुग्णालयांसह विविध विभागांची महत्वाची कार्यालये, इतर अत्यावश्‍यक सेवा तसेच घरून काम (वर्क फ्रॉम होम) करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 24 तास सुरळीत वीजपुरवठा देण्याचे कर्तव्य महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचारी अविश्रांत व युद्धपातळीवर बजावत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यावर तसेच अवकाळी वादळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यामुळे वीजयंत्रणेची मोठी हानी झाली. तरीही अहोरात्र कामे करून कमीतकमी वेळेमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. 

संसर्गाचा धोका टाळून किंवा झाल्यास त्याचा यशस्वी मुकाबला करून कोरोना संकटामुळे अनेक मर्यादा असताना अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कामगिरीची दखल घेऊन पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर येत्या स्वातंत्र्यदिनी मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासाठी आठ मंडल कार्यालय अंतर्गत प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचारी निवडण्यात येणार आहेत. त्यासाठी रास्तापेठ, गणेशखिंड, पुणे ग्रामीण, बारामती, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली मंडल कार्यालयांकडून अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची या गौरवासाठी निवड करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT