पश्चिम महाराष्ट्र

अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नी, प्रियकराने केला खून

सकाळवृत्तसेवा

विटा - अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने व सोडचिठ्ठी देत नसल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना अडीच महिन्यांनी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

सुभाष जगन्नाथ सूर्यवंशी (वय ४०, रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव) असे मृत पतीचे नाव आहे; तर शीला सुभाष सूर्यवंशी असे पत्नीचे व सूर्यकांत  पाटील ऊर्फ पापा (रा. जायगाव, ता. खटाव, जि. सातारा) असे प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी या दोघांना काल रात्री अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी मंगळवारपर्यंत (ता. २२) पोलिस कोठडी दिली. याची फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक धनाजी भगवान पिसाळ यांनी विटा पोलिसांत दिली आहे.

ढवळेश्वर (ता. खानापूर) हद्दीत विलास दत्तू किर्दत  यांच्या शेत जमिनीत ८ नोव्हेंबर २०१८ रोजी एक बेवारस मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाला होता. त्याची पोलिसांनी अकस्मात मृत अशी नोंद केली होती. नातेवाईकांनी त्याचे कपडे, चप्पल व फोटोवरून त्याचा मृतदेह ओळखला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. त्याची पत्नी शीला व तिचा प्रियकर सूर्यकांत याने त्याचे तीन मित्र व त्यांच्या तीन साथीदारांच्या मदतीने संगनमतांनी कट रचून ढवळेश्वर गावच्या हद्दीत सुभाषला नेऊन त्याच्या डोकीत लोखंडी रॉडने मारून खून केला. मृतदेह तेथेच फेकून देऊन सर्वजण पसार झाले, असे तपासात आढळले. पोलिसांनी शोध मोहीम राबवून काल त्याची पत्नी व प्रियकराला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ तपास  करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT