पश्चिम महाराष्ट्र

आरोपी भवाळच्या वकिलांना अपिलासाठी पाच दिवसांची मुदत 

सकाळवृत्तसेवा

नगर  - कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांची साक्ष नोंदविण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करण्यासाठी ऍड. बाळासाहेब खोपडे यांना आणखी पाच दिवसांची मुदत जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दिली. खंडपीठात दाखल करणार असलेल्या अपिलाच्या स्थितीबाबत शनिवारी (ता. 29) त्यांना म्हणणे मांडण्यास न्यायालयाने बजावले आहे. 

कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. सुनावणीत आरोपी संतोष भवाळचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी "यशदा'चे माजी अधिकारी रवींद्र चव्हाण, विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम, डॉ. राजाभाऊ थोरात, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, नाशिकच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे संचालक आणि नगरचे जिल्हाधिकारी यांची साक्ष नोंदविण्याबाबत दिलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर ऍड. खोपडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी न्यायालयाने अपिलाच्या स्थितीबाबत आजपर्यंत म्हणणे मांडण्यास बजावले होते. खटल्याचे कामकाज आज सकाळी अकरा वाजता सुरू झाले, त्या वेळी ऍड. खोपडे यांनी, "दीड वाजेपर्यंत सांगतो' असे न्यायालयास सांगितले. दीड वाजता ते न्यायालयात म्हणाले, की उच्च न्यायालयात अपिलाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने मुदत वाढवून मिळावी. 

त्यावर विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी आक्षेप घेतला. मात्र, न्यायालयाने पाच दिवसांची मुदत वाढवून दिली. आता 29 जुलै रोजी अपिलाबाबत म्हणणे मांडावे, त्यानंतर खटल्याच्या अंतिम युक्तिवादाची तारीख निश्‍चित केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT