पश्चिम महाराष्ट्र

मी त्या मुलीला मारले नाही - जितेंद्र शिंदे

सकाळवृत्तसेवा

नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्यात न्यायालयाने दोषी ठरविलेला मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे यांच्या शिक्षेवर आज युक्तिवाद झाला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोन्ही आरोपींना समोर बोलावून, "तुम्हाला शिक्षेबाबत काही सांगायचे आहे काय,' असे विचारले असता, "मी निर्दोष आहे. माझा या गुन्ह्याशी संबंध नाही,' असे सांगताना भैलुमे यास रडू कोसळले. "तुमची शिक्षा कमी का करावी, असे तुम्हाला वाटते,' असा प्रश्‍न न्यायाधीशांनी आरोपी शिंदे यास विचारला असता निर्विकार चेहऱ्याने तो उत्तरला, "मी त्या मुलीला मारले नाही. दुसरेच कोणी तरी मारले आहे. एक दिवस काय अन्‌ हजार दिवस काय; शिक्षा ती शिक्षाच..!'

कोपर्डी येथील निर्भयावर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता. कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली कोपर्डी) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी) या तिघांनाही न्यायालयाने शनिवारी (ता. 18) दोषी ठरविले. न्यायालयाने निकाल जाहीर करण्यापूर्वी आरोपींच्या वकिलांना दोन दिवस युक्तिवादाची संधी दिली.

त्यानुसार, आजपासून युक्तिवाद सुरू झाला. भैलुमे याचे वकील प्रकाश आहेर म्हणाले, 'कोपर्डी खटल्यातील आरोपी नितीन भैलुमे याचे वय कमी आहे. "शंभर गुन्हेगार सुटले, तरी चालतील; पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये,' याप्रमाणे आरोपी भैलुमे याचा या गुन्ह्याशी संबंध नाही. तपासलेल्या साक्षींवरून न्यायालयाने त्याला दोन कलमांखाली दोषी धरले. मात्र, त्याचा थेट खुनाशी किंवा बलात्काराशी संबंध नाही. त्याच्याविरुद्ध प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही. तो बी. एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याच्यावर आई-वडिलांची जबाबदारी आहे. त्याच्या आईवर शस्त्रक्रिया झाली असून, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी नितीनवर आहे. त्यामुळे त्यास कमीत कमी शिक्षा मिळावी.''

मुख्य आरोपीला जन्मठेप द्यावी!
मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्या वतीने त्याचे वकील योहान मकासरे यांनी शिक्षेसंदर्भातील युक्तिवाद केला. आरोपी जितेंद्र हा तरुण असून, त्याच्यावर आई-वडिलांची जबाबदारी आहे. अन्य गुन्ह्यांपेक्षा हा फारसा वेगळा गुन्हा नाही. त्यामुळे मुख्य आरोपी शिंदे यास फाशीऐवजी जन्मठेप द्यावी, अशी विनंती मकासरे यांनी न्यायालयास केली.

निकाल आज अपेक्षित
आरोपी संतोष भवाळ याच्या शिक्षेवर बुधवारी (ता. 22) ऍड. बाळासाहेब खोपडे यांचा युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आरोपींच्या शिक्षेवर युक्तिवाद करतील. त्यानंतर दुपारी न्यायालय निकाल जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT