protest march for kopardi
protest march for kopardi  
पश्चिम महाराष्ट्र

न्यायालयासह तणावग्रस्त कोपर्डीत कडेकोट बंदोबस्त; आज 'तो' निकाल 

सूर्यकांत नेटके

नगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या खटल्याचा आज (शनिवार) निकाल लागणार आहे. आधी या प्रकरणात आरोपी दोषी आहेत की नाही हे न्यायालय स्पष्ट करेल. आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यावर आजच अथवा एक दोन दिवसात आरोपीला न्यायालय शिक्षा सुनाविण्याचा अंदाज आहे. लोकांचे लक्ष असल्याने आणि आरोपींवर या आधी हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगरला जिल्हा न्यायालयासह कोपर्डी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केलेल्या खटल्याची सुनावणी आणि अंतिम युक्तिवाद संपलेला आहे. आज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले   या खटल्यासंदर्भातील निरीक्षणे नोंदवतील. त्यानंतर आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे या आरोपींना न्यायालय शिक्षा सुनावेल. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी; तर आरोपी तर्फे योहान मकासरे, बाळासाहेब खोपडे व प्रदीप आहेर यांनी बाजू मांडलेली आहे. खटल्यात सरकार पक्षातर्फे 32 साक्षीदार तर आरोपीतर्फे एक साक्षीदाराची साक्ष झालेली आहे.

 निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात व परिसरात शंभर पोलिसांचा बंदोबस्त असेल. त्यात एक डीवायएसपी,  4 सहायक पोलिस निरीक्षक, 75 पोलिस कर्मचारी तसेच राखीव पोलिसांच्या तुकड्या असतील. तसेच कोपर्डी गावातही सत्तर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गावात एका पोलिस उपअधीक्षकासह 63 पोलिस कर्मचारी, दोन राखीव तुकड्या असतील, असे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातून सांगण्यात आले. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. प्रत्येक नागरिकाची तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT