पश्चिम महाराष्ट्र

नवरात्र उत्सवाचे वेध!

सकाळवृत्तसेवा

सातारा - गणेशोत्सव संपताच कार्यकर्त्यांना आता नवरात्र उत्सवाचे वेध लागलेत. कार्यकर्त्यांकडून उत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. मूर्तिकारांची मूर्ती पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली आहे. कुंभार कलाकारांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसबरोबरच शाडूच्या मूर्तीही तयार केल्या आहेत. दरम्यान, इंधन दरवाढीचा फटका या व्यवसायासही बसला असून, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मूर्तीच्या किमतीतही किंचित वाढ होणार आहे. 

जिल्ह्यात ग्रामीण भागातही गणेशोत्सव संपताच सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेध लागतात ते मूर्ती, रोषणाईसह उत्सवाचे. हा उत्सव असतो आदिशक्ती, आदिमायेच्या पूजन आणि तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा. काही मंडळे तर गणेशोत्सवासाठी घातलेला मंडप काढतच नाहीत. त्याच मंडपात देवीची स्थापना करतात. या उत्सवात फारशी सजावट केली जात नाही. मात्र, विद्युत रोषणाईवर भर दिला जातो. रात्री गीत आणि संगीताच्या तालावर मंडपासमोर तरुणाईचा रास-गरबा, दांडिया रंगतो. नवरात्र होईपर्यंत संगीताच्या तालावर तरुणाई थिरकते.  

यंदा शाडूच्या मूर्तींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी झाल्या असे नाही. कुंभारवाड्यात मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. यावेळी शाडू माती तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे. तसेच रंग, मजुरीच्या दरातही वाढ झाल्याने मंडळांना दहा ते १५ टक्के जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. साताऱ्यात बऱ्याच मंडळांनी मोठ्या आणि उंच मूर्तींचे नियोजन केले आहे.

शक्ती ज्योतीचीही तयारी
अनेक मंडळांचे कार्यकर्ते शिवजयंतीप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी विविध देवतांच्या प्रसिद्ध ठिकाणांवरून शक्ती ज्योती आणतात. तुळजापूर, प्रतापगड, कोल्हापूरची अंबाबाई, औंधची यमाई येथून शक्ती ज्योती प्रज्वलित करून आणल्या जातात. मंडळांचे कार्यकर्ते त्याचे नियोजन करू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT