सातारा - बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवाब दो.. जॉब दो.. चा नारा देत भजी तळण्याचे आंदोलन केले.
सातारा - बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवाब दो.. जॉब दो.. चा नारा देत भजी तळण्याचे आंदोलन केले. 
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात तळले ‘मोदी’वडे...

सकाळवृत्तसेवा

सातारा - गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है, या मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, वडापाव वाले... घ्या मोदी वडा, मोदी सरकारची भजी घ्या, अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, महिला व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने बेरोजगारीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मंडपात चुलीवरील भजी व वडे तळून कार्यकर्त्यांनी ती विकून मोदींच्या धोरणांचा निषेध नोंदविला.

वाढलेल्या बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आज ‘जवाब दो.. जॉब दो’ आंदोलन केले. या पार्श्‍वभूमीवर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष अतुल शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, कार्याध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी व युवक, युवती आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

या वेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या, तसेच मंडपात वडा व भजी तळून मोदी वडा घ्या..., मोदी सरकारची भजी घ्या..., म्हणत भजी व वड्यांची विक्री केली. 

या वेळी बोलताना सुनील माने म्हणाले, ‘‘नोटाबंदीनंतर दोन वर्षांत सव्वा कोटी लोक बेरोजगार झाले. नवे रोजगार निर्मितीत भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे.

याबाबतची आकडेवारी सरकारी सर्वेक्षणात पुढे आली आहे. मोदी सरकारने सत्तेवर येतान दोन कोटी युवकांना रोजगार देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र, सरकार आश्‍वासने पूर्ण करू शकलेले नाही. त्यामुळे हे अपयश मान्य करण्याऐवजी निर्लज्जपणे खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकत आहे. तरुणांतील रोष व असंतोषाला वाचा फोडणसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे बेरोजगारी विरोधात धरणे आंदोलन केले आहे.’’ 

या आंदोलनात श्री. माने व तेजस शिंदे यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, दत्तात्रेय उत्तेकर, ॲड. नितीन भोसले, गोरखनाथ नलवडे, मंगेश ढाणे, सागर जगताप, सनी शिर्के, मारुती इदाटे, उद्धव बाबर, पांडुरंग पोतेकर, राजेंद्र लवंगारे, कविता मेणकर, नंदिनी जगताप, सविता शिंदे, शफिक शेख, सागर कांबळे, सतीश माने, सचिन कुराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनस्थळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती राजेश पवार, मनोज पवार, पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे, जयवंत भोसले, राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे, संभाजीराव गायकवाड आदींनी भेट देऊन सहभाग नोंदविला.

आम्ही राष्ट्रवादीचे नोकर नाही.....
आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटच्या बाजूला राष्ट्रवादीने मंडप उभारून त्यावर बॅनर व झेंडे लावले होते. आंदोलन संपल्यानंतर झेंडे व बॅनर काढण्यासाठी युवक व विद्यार्थी सेलचे पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना मोबाईलवरून सांगू लागले. काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हे झेंडे काढले; पण उर्वरित काम कोणी करायचे यावरून वाद रंगला होता. वैतागून एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आम्ही राष्ट्रवादीचे नोकर नाही... पदाधिकारी आहोत, असे युवक, विद्यार्थी, सेलच्या पदाधिकाऱ्याला सुनावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT