NCP candidate from Mohol should be given the Bhima familys views says Dhananjay Mahadik
NCP candidate from Mohol should be given the Bhima familys views says Dhananjay Mahadik 
पश्चिम महाराष्ट्र

मोहोळमधील राष्ट्रवादीचा उमेदवार भीमा परिवाराच्या विचारांचाच द्यावा : धनंजय महाडिक

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादीचा उमेदवार भीमा परिवाराच्या विचारांचाच द्यावा, अन्यथा आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल, असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे अध्यक्ष माजी खा. धनंजय महाडिक यांनी केले.

टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भीमा कारखान्यावर कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महाडिक आले असता, त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, आजपर्यंतच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आम्ही समर्थन दिले आहेच, येत्या विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला समर्थन पाहिजे असेल तर, आमच्याशी चर्चा झालीच पाहिजे. भिमा परिवाराची ताकद मोठी आहे, आम्ही थोडं लक्ष घातल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निम्मी सत्ता मिळाली आहे. सध्या कोल्हापूर मतदार संघाबरोबरच मोहोळ तालुक्यातही आता पूर्ण लक्ष देणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

मी राष्ट्रवादीचा खासदार असतानाही आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेना, भाजप, काँग्रेस, आरपीआय या पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला सहकार्य केले म्हणूनच आज पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश प्राप्त झाले. त्यामुळे सर्व जनतेशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीचा उमेदवार भीमा परिवाराच्या विचाराचा दिल्यास वरील सर्व पक्षातील कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्यासाठी परिश्रम घेतील यात शंका नाही.

राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यक्रमास आमच्या कार्यकर्त्यांना बोलावले जात नाही, वा विश्वासात घेतले जात नाही, अशीच परिस्थिती राहिली तर मात्र वेगळा विचार करावा लागेल, असे ही महाडीक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT