Sujay Vikhe Patil and Sangram Jagtap
Sujay Vikhe Patil and Sangram Jagtap 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : नगरमध्ये मोठी लढत; सुजयच्या विरोधात संग्राम 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : नगर लोकसभा मतदारसंघात आमदार संग्राम अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी (ता. २०) केली. त्यामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले डॉ. सुजय विखे यांचा सामना संग्राम जगताप यांच्याशी रंगणार आहे. 

संग्राम जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतानाच जगताप यांचा विजय निश्‍चित असल्याचेही श्री. पाटील म्हणाले. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विचारांवर, त्यांनी तयार केलेल्या आघाडीवर विश्‍वास ठेवत असतील तर काँग्रेसचे लोक मदत करतील, असा दावाही त्यांनी केला. या वेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार प्रकाश गजभिये, मीडिया विभागाचे प्रमुख संजय खोडके उपस्थित होते.

माढ्याची उमेदवारी विजयसिंहांनाच मिळणार होती 
विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार होती. त्यांच्या नावावर पवारसाहेबांनी शिक्कामोर्तबही केले होते आणि तसे त्यांना कळविण्यात आले होते, अशी माहिती पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर  पाटील म्हणाले, की पक्षाच्या स्थापनेपासून विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्रिपद भूषविले, विद्यमान खासदारही आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील हेही खासदार होते. आताही विजयसिंह मोहिते पाटील यांनाच पक्ष उमेदवारी देणार होता; परंतु त्यांनी दुसरे नाव दिले. त्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला. राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याआधीच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी (ता. २०) पक्ष सोडला. माढा मतदारसंघात आम्ही सक्षम उमेदवार देऊ. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा माढा जिंकण्याचा भ्रम तुटेल, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT