Ajit Pawar
Ajit Pawar 
पश्चिम महाराष्ट्र

'पिचडजी लक्ष ठेवा, गाठ अजित पवारांशी आहे'

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : नगरमधील अकोले दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादीने पिचडांना सर्वकाही दिले, पण तरीही पिचड गेले, त्यांनी मोठं पाप केले. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे, असा इशारा अजित पवारांनी पिचड पिता-पुत्रांना दिला.

भाजपसारख्या पक्षाचा पराभव करण्यासाठी एकविचाराचे सर्व एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीतून राजे गेले, सेनापती गेले, नेतेही गेले. पण शरद पवार ठामपणे काम करत आहेत. १९९५-१९९९ मध्ये  युतीचं सरकार तेव्हा पिचडांना विरोधी पक्षनेतेपद दिलं. मंत्रिपदे दिली, जि.प. अनेक पदे अकोलेत यांनाच दिली. तरीही पिचड गेले, मोठं पाप पिचडांनी केलं आहे. एकास एक उमेदवार देण्याच्या निर्णयावर ठाम राहा. आमिषाला बळी पडू नका. कार्यकर्त्यांना दमबाजी करु नका”, असं आवाहन अजित पवार यांनी केले.

पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला. विधानसभेला राष्ट्रवादीला निवडून द्या, त्यांचं (सीताराम गायकर) यांचं धोतर फेडू, असे म्हणत अजित पवारांनी पिचडांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवला.

आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देणार. दिली नाही तर पवारांची औलाद नाही. थोर पुरूषांची नावं घेऊन सत्तेवर आले. पण कोणतंही आश्वासन पूर्ण केली नाहीत. गड किल्यात आता छमछम सुरू करणार. आम्ही बंद केलेले डान्स बार यांनी सुरू केले, असे म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड-पुत्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, जि. प सदस्या सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT