shivaji-gade
shivaji-gade 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी गाडे यांचे निधन

सकाळवृत्तसेवा

राहुरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषद सदस्य शिवाजी रामभाऊ गाडे (वय ५६, रा. बारागाव नांदूर) यांचे आज (मंगळवारी) पहाटे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले.

पहाटे तीन वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने नगर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तथापी, रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, विशाल व धनराज ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघातून गाडे यांनी दहा वर्षांपूर्वी  'रिडालोस' तर्फे आणि मागील वेळी 'राष्ट्रवादी काँग्रेस' तर्फे विधानसभेची निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते. 'राजे' या नावाने ते परिचित होते. गोरगरिबांच्या सुख-दुःखात ते नेहमी अग्रभागी असत. माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचे सरपंच पदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. मुळा प्रवरा वीज संस्थेचे चेअरमन व राहुरी पंचायत समितीचे सभापती या पदांवर काम करत असतांना त्यांचे नेतृत्व बहरले. सध्या ते जिल्हा परिषद सदस्य, डॉ बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, बारागाव नांदूर व इतर चौदा गावे संयुक्त पाणी पुरवठा योजना व देखभाल समितीचे अध्यक्ष, राहुरी तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष पदांवर काम करीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT