पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढ्यात नाट्यग्रृह होणासाठी नगरपालिकेकडून प्रयत्नांची गरज

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - शहरामध्ये आद्यवत नाट्यग्रृह नसल्यामुळे नाट्य कलावंतांची कुचंबणा होत आहे. नाट्यकलावंतांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृह होणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेतून प्रयत्नांची गरज आहे.

पंढरपूर पाण्याचं, सांगोला सोन्याचं आणि मंगूड अस्सल दाण्याचं याप्रमाणे संताची नगरी म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेल्या मंगळवेढ्यात अनेक नामवंत संत होऊन गेले. शिवाय ज्वारीच्या निमित्ताने मंगळवेढ्याची ओळख महाराष्ट्राभर वाढली असताना, याच मातीमध्ये अनेक कलाकार देखील उदयास येत आहेत. परंतु, त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी बाहेरगावी जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. या कलेला कमी प्रतिसाद मिळाला की निराश होऊन या क्षेत्रापासून दूर जाण्यापेक्षा याच कलाकारांना शहरातच व्यासपीठ निर्माण झाले तर उत्तम कला सादर करतील. 

सध्या येथील नाट्यरसिकांना उत्तम दर्जाची नाटके पाहण्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी जावे लागत आहे. त्यापेक्षा शहरात सुसज्ज नाट्यगृह झाल्यास शहरातील कलाकारांच्या कलागुणाला वाव मिळून बाहेरगावचे कलाकारदेखील शहरात उत्तम कला सादर करू शकतील. अलीकडच्या काळातील तरुणांनी देखील या क्षेत्रामध्ये चांगले काम करत आहेत. काहींना चित्रपटांमध्ये चमकण्याची संधी देखील मिळाली. तर काहींनी नाट्य कलावंताला बाहेरगावी जाऊन सादरीकरणाचे काम करण्यापेक्षा हे क्षेत्र सोडलेले बरे अशी भूमिका घेतली. 

सध्या पालिकेच्या असलेले मंगल कार्यालयामध्ये काही नाट्यकलावंतांना कला सादर करण्याची संधी मिळत मिळाली परंतु सध्या पालिकेचा टाऊन हॉल दुरुस्तीच्या नावाखाली बंद असून, त्यामुळे अनेक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरणा पासून वंचित आहेत. आतापर्यंत शहर व ग्रामीण भागातून पेक्षा अधिक कलावंत होऊन गेले त्याच्यातील रसीकतेला वाव देण्यासाठी नाट्यगृहाची आवश्यकता आहे. पालिकेचे लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देतात याकडे नाट्यकलावंताचे लक्ष लागले.

राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेमध्ये मला नामांकन मिळाले त्यासाठी मला सोलापूरला सराव आणि सादर करण्याला यावे लागले मंगळवेढ्यात नाटकं झाले तरी हा खर्च बचत होऊन आणखीन उत्तम कला सादर करता येईल.त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.
 - सागर साळुंके नाट्यकलावंत मंगळवेढा..

नाट्यगृहा अभावी नाट्यकलावंताची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नाट्यगृहासाठी आराखडा व प्रस्ताव तयार करून निधीसाठी मागणी केली असून आचारसंहीता संपताच हा विषय मार्गी लागेल.
- अजीत जगताप सदस्य  नियोजन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT