New teacher replacement orders; Some errors remain the same, the process will have to be completed by May 31st 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षक बदलीचे नवे आदेश; काही त्रुटी तशाच, 31 मेपर्यंत प्रक्रिया राबवावी लागणार

अजित झळके

सांगली ः जिल्हा परिषद शिक्षक बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिले. यासाठी सुधारित धोरण निश्‍चित केले आहे. येत्या 31 मे अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन आदेशातील अनेक तरतुदी कायम असून त्यामधील त्रुटी फार दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे गोंधळ कायम राहण्याची शक्‍यता आहे. 


यापूर्वी जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबत धोरण निश्‍चित केले होते. यानुसार शिक्षकांच्या बदल्या केल्या जात होत्या. परंतु शिक्षकांची मोठी संख्या व कामाचे भिन्न स्वरुप लक्षात घेऊन सरकारने यात बदल केला आहे. आता अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत.

विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्या शिक्षकांचा विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये समावेश केला आहे. व्याधीग्रस्त शिक्षकांच्या जोडीदारांचा यात समावेश केला आहे. पती-पत्नी एकत्रीकरणाचा संवर्ग दोनमध्ये समावेश आहे. 


सलग दहा अथवा पाच वर्षे सेवा झालेले शिक्षकच नव्या धोरणात बदलीस पात्र ठरणार आहेत. रिक्त जागा भरण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याद्या प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेतला जाईल. बदली प्रक्रिया सहा टप्प्यात राबविली जाईल. बदलीच्या ठिकाणी शिक्षक रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

बदली प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन राहणार आहे. राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. बदली गैरसोयीची असेल तर त्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षकास विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची मुभा आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT