Now airport facilities are available on railway stations
Now airport facilities are available on railway stations 
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा 

तात्या लांडगे

सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संबंधित मार्गावरील रेल्वेगाडी सुटण्याच्या 20 मिनिटे अगोदर प्रवाशांना स्थानकात सोडण्यात येणार आहे. राज्यातील सोलापूरसह नागपूर, पुणे, मुंबई यासह अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा यामध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली. 

खासगी वाहतुकीचे दर वाढल्याने आणि प्रवास आरामदायी नसल्याने बहुतांश प्रवाशांचा कल आता रेल्वेकडे वाढल्याचे पाहायला मिळते. उन्हाळा असो की हिवाळा, पावसाळा रेल्वे प्रवाशांची गर्दी अद्यापही कमी झाली नाही. दिवसेंदिवस त्यामध्ये भरच पडत असल्याचे दिसून येते. परंतु, काही वेळा अनावश्‍यक गर्दी अथवा काही अफवांमुळे प्रवाशांची धावपळ होते आणि चेंगराचेंगरीचे प्रकार घडण्याची शक्‍यता असते. अशा घटनांवर नियंत्रण आणण्याकरिता आता रेल्वे बोर्डाकडून ठोस आराखडा तयार केला जात असल्याची माहिती खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी दिली. 

सोलापूर स्थानकाची स्थिती -

  • दिवसभरात ये-जा करणाऱ्या रेल्वे - 94 
  • स्थानकावरील प्रवासी - 23,000 
  • अनावश्‍यक व्यक्‍ती - 7,400 

ठळक बाबी... 

  • प्रत्येक प्रवाशाचे होईल चेकिंग 
  • हॅलो.. हाय करायला आलेल्यांना मिळणार नाही प्रवेश 
  • गाडी सुटण्यापूर्वी प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर 20 मिनिटे अगोदर मिळणार प्रवेश 
  • अपघात अन्‌ गर्दीवर येणार नियंत्रण 
  • विमानतळांवरील प्रवाशांना मिळणाऱ्या बहुतांशी सेवा- सुविधाही उपलब्ध होणार

    एअरपोर्टवर विमान उड्डाण करण्याच्या काही मिनिटे अगोदर प्रवाशांना आत प्रवेश दिला जातो. जेणेकरून अनावश्‍यक गर्दी होत नाही आणि अनुचित प्रकारांना आळा बसतो. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरसह राज्यातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाकडून त्याचे नियोजन सुरू आहे. 

- ऍड. शरद बनसोडे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT