पश्चिम महाराष्ट्र

समुद्राकडे बघत दिवस काढला

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ‘‘रशिया कोठे आहे, क्रोएशिया कोठे आहे हे मला माहिती नाही. तेथे जहाजावर झालेल्या दुर्घटनेत माझ्या मुलाचे काय झाले असेल याचा मी कसा अंदाज करायचा? आज मुंबईत मी आणि साऱ्या परिवाराने समुद्राकडे बघत दिवस काढला आहे. फोनची रिंग वाजली की काळजात धस्स होते..’’ अशा शब्दात अक्षयचे वडील बबन जाधव (रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

रशियामध्ये तेलवाहू जहाजास लागलेल्या भीषण आगीत जहाजावरील त्यांचा मुलगा अक्षय बेपत्ता झाल्याचा त्यांना निरोप मिळाला आणि अक्षय ज्या कंपनीच्या जहाजावर होता, त्या कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात ते पोचले आहेत. 
अक्षय जाधव मूळचा शाहूवाडी तालुक्‍यातील व्हरकटवाडीचा. त्याचे वडील बबन जाधव वारणा दूध संघात नोकरीला. त्यामुळे ते कोडोलीत राहतात. १२ वी झाल्यानंतर अक्षयने चेन्नई येथे खलाशी प्रशिक्षण पूर्ण केले. सहा महिन्यांपूर्वी तो तेलवाहू जहाजावर नोकरीस लागला. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा नोकरीचा पहिला करार संपणार होता. २१ जानेवारीला त्याचा वडिलांना फोन आला. आता सुटी घेऊन ये, असे वडिलांनी सांगितले; पण प्रवासाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुटी घेऊन येतो, असे अक्षयने सांगितले. त्यानंतर त्याचा फोन आला नाही; पण त्याच्या कंपनीच्या मुंबई कार्यालयातून दुर्घटनेची माहिती व अक्षय बेपत्ता असल्याची माहिती देणारा फोन आला.

त्यानुसार काल रात्री तातडीने अक्षयचे वडील, काका, भाऊ मुंबईला निघाले. आज त्यांनी कंपनीत काही अधिकाऱ्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी झालेली घटना व त्यात अक्षय बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यानंतर ते कार्यालयाबाहेर पडले. एका पोलिस नातेवाइकाच्या साहाय्याने इकडे-तिकडे चौकशी करत राहिले. कंपनीतून येणाऱ्या फोनची वाट बघत मुंबईत समुद्राकाठी बघत राहिले. रात्रीपर्यंत त्यांना ठोस माहिती मिळाली नव्हती. सारा परिवार अस्वस्थ होता. इकडे व्हरकटवाडीत अक्षयच्या आईची तगमग क्षणाक्षणाला वाढत राहिली. डबडबलेल्या डोळ्यांनी ती मुंबईहून येणाऱ्या निरोपाची वाट पाहत राहिली.

अक्षयचा शोध सुरू
अक्षयचे वडील बबन जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार, रशियात काही दिवसांपूर्वी दोन तेलवाहू जहाजांना आग लागली. या दुर्घटनेत काही जणांचा बळी गेला. काही जण बेपत्ता आहेत. या बेपत्तांमध्ये अक्षय जाधवचा समावेश आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे कंपनीच्या मुंबई कार्यालयातून सांगण्यात आले.

संबंधीत बातम्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT