पश्चिम महाराष्ट्र

गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

पंडित कोंडेकर

इचलकरंजी - येथील स्थानिक गुन्हे शाखेने ओमकार उर्फ सोन्या बाबासो सुर्यवंशी (वय 20, रा. हजारमाची, राजारामनगर, ओगलेवाडी, ता. कर्‍हाड) याला अटक करून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल व चार जिवंत काडतुसे जप्त केली. वडगाव ते वाठार मार्गावरील हॉटेल स्वागतसमोर त्याला आज पथकाने सापळा रचून पकडले.

वर्षभरापूर्वी ओमकारने युपीमधील एका कामगाराकडून हे पिस्तुल खरेदी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास जाधव यांनी पत्रकारांना दिली. संशयीत सुर्यवंशी सेट्रींग कामगार आहे.

कर्‍हाड रेल्वे स्टेशनमधील एका उत्तरप्रदेशच्या कामगाराकडून त्याला कमी किंमतीत हे पिस्तुल वर्षभरापूर्वी मिळाले होते. हौस म्हणून त्याने हे पिस्तुल विकत घेतले होते. त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून पकडले. त्याच्यावर अद्याप कोणत्याही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद नसल्याचे तपासात पुढे आले आहे.

इचलकरंजीतील त्याचे कोणाशी संबंध आहेत का याचीही शहानिशा पोलिस करीत आहेत. या कारवाईत पोलिस उपनिरिक्षक अमोल माळी, रणजीत तिप्पे, सहाय्यक फौजदार चंदू ननवरे, हवालदार वैभव दड्डीकर, रणजीत पाटील, विजय तळस्कर, रवी कोळी यांनी भाग घेतला. संशयीत सुर्यवंशी याला वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT