पश्चिम महाराष्ट्र

जावळी तालुक्यातील सुलेवाडी येथे आगेमोहळ माशा चावल्याने एकजण ठार

रविकांत बेलोशे

भिलार - सुलेवाडी, घोटेघर (ता.जावळी) येथे आगेमोहोळ मधमाश्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर आहे. या हल्ल्यात सुलेवाडीतील सुमारे १० ते १५ लोक जखमी झाले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील घोटेघर गावाची सुलेवाडी ही वस्ती डोंगरमाथ्यावर वसली आहे. सुलेवाडीवस्तीच्या खालच्या बाजूस डोंगराच्या मध्यावर रांजनी गावच्या हद्दीत असणाऱ्या काळाआंबा या शिवारात काल सकाळी अचानक आगेमोहोळ उठून त्याच्या माशा वरच्या बाजूला सुलेवाडी वस्तीत घुसल्या. आणि त्या गावातील महिला व पुरुषांना चावल्या. माशांच्या या हल्ल्याने वाडीत गोंधळ उडाला सर्वजण सैरावैरा पळाले काही ग्रामस्थानी धोका ओळखून गवताला आग पेटवून माशा हाकलण्याचा प्रयत्न केला परंतु, तोपर्यंत गावातील सूमारे १५ जण जखमी केले होते.

या हल्ल्यात शांताराम बळवंत रांजणे (वय.50वर्ष) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परंतु, त्यांचा मृत्यू झाला. तर यामध्ये जखमी झालेल्या जनाबाई बबन गायकवाड (वय 70) ही महिला गंभीर असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यात सुभाष भगवान रांजणे, आत्माराम आनु रांजणे, बापु सहदेव झाडे, रघुनाथ कृष्णा पडसरे रमेश दगडू झाडे, काशीनाथ विठ्ठल रांजणे हे जखमी झाले आहेत. या हल्ल्याने सुलेवाडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. चावा झाल्याने जखमी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT