भुरकवडी (ता. खटाव) - येथील म्हारकीचे माळ नावाच्या शिवारात कांदा स्वच्छतेचे काम करताना महिला.
भुरकवडी (ता. खटाव) - येथील म्हारकीचे माळ नावाच्या शिवारात कांदा स्वच्छतेचे काम करताना महिला. 
पश्चिम महाराष्ट्र

भुरकवडीकरांच्या कांद्याची दिल्लीकरांना भुरळ

अंकुश चव्हाण

कलेढोण - खटाव तालुक्‍यात पुसेगाव, बुध, चितळीबरोबरच देशांतर्गत निर्यातीत प्रसिद्ध असलेल्या भुरकवडीकरांच्या कांद्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. देशांतर्गत निर्यातीमुळे कांदा काढणी, कापणी, भरणी, वाहतूक अशा पद्धतीने रोजगार करण्याऱ्यांत महिलांची संख्या लक्षणीय आहे.

एरव्ही कांद्यामुळे डोळ्यात पाणी येते. मात्र, खटाव तालुक्‍यातील कांद्याच्या उत्पन्नामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. तालुक्‍यात बटाटा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या पुसेगाव परिसरात कांद्याचेही चांगले उत्पन्न घेतले जाते. कांद्याच्या दरातील होणाऱ्या चढ-उताराला येथील शेतकरी सामोरे जात पुसेगाव, बुध, डिस्कळ, ललगुण, खटाव, भुरकवडी, चितळी, शेडगेवाडी आदी परिसरात ‘लोणंद’ कांद्याचे मुबलक पीक घेतले जाते. त्यामुळे या परिसरातील विशेषतः महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दुष्काळी पट्ट्यात उपलब्ध पाण्यावर येथील शेतकरी कांद्याचे पीक घेतो. रोजगाराच्या सुविधा उपलब्ध नसलेल्या या भागात हंगामी रोजगार महिलांना मिळतो. त्यासाठी २०० रुपयांचा रोज त्यांना मिळतो. चालू हंगामात भुरकवडीतील म्हारकीचे माळ नावाच्या शिवारात कांद्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. या भागात परिसरातील पुसेगाव, वडूज व दहिवडीतील व्यापारी हजेरी लावत कांद्या खरेदी करीत आहेत. त्यानंतर हा कांदा दिल्लीच्या बाजारपेठेत दाखल होतो. त्यास सात ते साडेनऊ रुपये किलो असा भाव मिळाल्याचे भुरकवडीच्या गणपत कदम यांनी सांगितले. एका मालवाहतूक ट्रकमध्ये सुमारे २५ टन कांदा बसतो. आतापर्यंत या भागातून ४०० टन कांदा निर्यात करण्यात आला असून हा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे.

कांदा काढणी, कापणी, भरणी, वाहतुकीचे काम करण्यासाठी दररोज सुमारे ६० ते ७० महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यासाठी त्यांना २०० रुपयांची रोजंदारी मिळते.    
- गणपत कदम, भुरकवडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT