पश्चिम महाराष्ट्र

शिरोळमध्ये केवळ १३ कॅन्सर रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

शिरोळ - तालुक्‍यातील ५३ गावांमध्ये कॅन्सर रुग्ण शोधमोहीम राबवण्यात आली असून, या मोहिमेमध्ये १३ कॅन्सर रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १४०३ संशयित रुग्णांपैकी ११२ रुग्णांना संदर्भसेवा दिली आहे. यामुळे शिरोळ तालुक्‍यामध्ये कॅन्सर रुग्ण सर्वाधिक असल्याचा बाऊ करू नये, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती रूपाली मगदूम व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. दातार यांनी केले आहे. 

मगदूम व दातार माहिती देताना म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजन समितीच्या आर्थिक तरतुदीतून आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती शिरोळ यांच्यावतीने आशा सेविकांमार्फत कॅन्सरपूर्व लक्षणे व कॅन्सर रुग्ण यांचा शोधमोहीम कार्यक्रम झाला. तालुक्‍यातील ५३ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये ६६ हजार ३०१ गृहभेटी देण्यात आल्या. आरोग्य कर्मचारी, आशा यांनी अनुषंगाने केलेल्या प्रश्‍नावलीनुसार कॅन्सर रुग्ण व कॅन्सरपूर्व लक्षणे याबाबतची माहिती संकलित केली. ३ लाख ५५८ लोकसंख्येतून १४०३ संशयित रुग्ण आढळून आले.

१४०३ संशयित रुग्ण आढळल्यानंतर ग्रामीण रुग्णालय शिरोळ, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदणी, अब्दुललाट, टाकळी, दानोळी, नृसिंहवाडी, तसेच पंचायत समिती शिरोळ व ॲपल हॉस्पिटल, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट, कोल्हापूर यांच्यावतीने कॅन्सर रोग निदान शिबिर घेतले. १४०३ पैकी ११२८ संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ११२ रुग्णांना संदर्भ सेवा दिली आहे. कॅन्सर रुग्णांबाबत विविध चाचण्या केल्यानंतर केवळ १३ कॅन्सर रुग्ण आढळले आहेत. 

शिरोळ तालुक्‍यातील कॅन्सर रुग्णांबाबत वेगवेगळी माहिती प्रसिद्ध केली जात आहे. कॅन्सर रुग्णांबाबत तालुक्‍याचा बाऊ केला जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. 
- डॉ. पी. एस. दातार,
तालुका वैद्यकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT