ropvatika
ropvatika 
पश्चिम महाराष्ट्र

इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. 

मोहोळ येथील शासकीय रोपवाटिकेला प्रतापसिह यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. त्यांनी रोपवाटीकेतील नारळ, सिताफळ, आंबा, चिकु, डाळींब आदी रोपांची, मातृवृक्षाची तसेच नवीन तंत्रज्ञानानुसार खोगीर बांधणी कलमांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तर कृषी पर्यवेक्षक डी. टी. पवार यांचे त्यांनी कौतुक केले.

चालु वर्षी रोपवाटीकेतुन विविध फळांची मिळुन 52 लाख 25 हजाराची रोपे शेतकऱ्यांना विक्री केल्याचे पर्यवेक्षक पवार यांनी सांगितले. एवढी प्रगती पाहुन आयुक्त प्रतापसिह यांनी चारा टंचाईवर मात करण्यासाठी वैरण विकास कार्यक्रमांतर्गत मका व न्युपीयर या घास चाऱ्याच्या वाणाची लागवड करण्याची सूचना केली.

यावेळी आयुक्त प्रताप सिंह यांच्या समवेत विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर, तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी, प्रा. दगडु कदम, संग्राम इंगळे, एस. के. पवार, पी. जी. पाटील, संजय काळे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT