गोळी
गोळी  sakal
पश्चिम महाराष्ट्र

पांचगणीत बस मध्ये बंदुकीच्या गोळी सदृश्य वस्तू आढळली

सकाळ वृत्तसेवा

भिलार: पांचगणी बस स्थानकात एका बस मध्ये बंदुकीच्या गोळी सदृश्य वस्तू आढळल्याने एकच गडबड झाली. पोलिसांनी ती वस्तू तातडीने ताब्यात घेतली आहे.याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की आज सकाळी स्वारगेट- महाबळेश्वर ( बस क्र MH14 BT1226 ) ही ऐस टी गाडी पाचगणी बस स्थानकात पोहोचली.

या गाडीमधील प्रवासी यांनी बस वाहक श्री. धोत्रे यांना आपल्या गाडीमध्ये बंदुकीच्या गोळी सदृश्य वस्तू असल्याचे सांगितले. तेव्हा वाहक धोत्रे यांनी लगेच याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात कळविले. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचेसह त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस फौजदार श्री. माने, पोलोड हवालदार श्री. बाबर , पोलीस हवालदार श्री.फरांदे ,पो नाईक निलेश माने , म पो नाईक श्री. साठे , पो शिपाई श्री. जगताप हे सर्वजण बस स्थानकावर घटनास्थळी गेले व त्या बसची पाहणी केली. त्यानंतर सदर गोळी जप्त केली असून पुढील तपास चालू आहे .

या गोळीबाबत माहिती घेण्याचे काम चालू असून अधिक तपास पांचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT