पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात खुल्या १९ गटांत ‘काटा लढत’

सकाळवृत्तसेवा

सांगली - स्थानिक स्वराज्य संस्थेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या मिनी मंत्रालय व पंचायत समिती निवडणुकीसाठीचे पत्ते आज खुले झाले.

गट व गणांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तातडीने उमेदवारांची शोधमोहीम सुरू केली आहे. गेले अनेक दिवस हुरहूर लागून राहिलेल्या इच्छुकांत ‘कहीं खुशी, कहीं गम’ असेच वातावरण आहे. झेडपीचे अध्यक्षपद आगामी अडीच वर्षांसाठी राखीव आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीने होणार आहे. विशेषतः खुल्या गटासाठीच्या १९ मतदारसंघांत काटा लढत पाहायला मिळेल. 

जिल्हा परिषदेचे ६० गट आणि पंचायत समितीच्या १२० गणांसाठी आज सोडत काढण्यात आली. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे हरिपूर गटातून निवडून आलेल्या मंगल कोळी यांना नव्या समडोळी गटातून पुन्हा निवडून येण्याची संधी आहे. विद्यमान सदस्यांची सुट्टी तर जुन्या सदस्यांसह अनेक नव्यांना संधी मिळणार आहे.   

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद गटांचे आरक्षण काढण्यात आले. अध्यक्ष स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील, संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, कुसूम मोटे या सहा पदाधिकाऱ्यांसह ६१ जणांचा पत्ता कट झाला. ५० टक्के महिला आरक्षण असल्यामुळे ६० पैकी ३० मतदारसंघ स्त्री राखीव राहिले आहेत. लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. 

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, दिनकर पाटील, ॲड. बाबासाहेब मुळीक, रवींद्र बर्डे, शिवसेनेचे बजरंग पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील, सभापती संजीव सावंत, सम्राट महाडिक, सुरेश मोहिते, प्रकाश कांबळे, प्रकाश देसाई यांच्यासह विविध गटांतील इच्छुक व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असतानाही सभागृहात केवळ एकच महिला उपस्थित होती.   

या माजी सदस्यांना पुन्हा संधी
समडोळीतून विद्यमान सदस्य मंगल कोळी, भोसेतून माजी अध्यक्षा कांचन पाटील, संखमधून माजी सभापती सुजाता पाटील पुन्हा रिंगणात उतरू शकतात.

झेडपी अध्यक्षपद खुले
सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सन फेब्रुवारी १७ पासून अडीच वर्षे सर्वसाधारण (खुले) गटासाठी राखीव आहे. अर्थात सर्व म्हणजे ६० गटांतून निवडून येणारे सदस्य अध्यक्षपदासाठी दावा करू शकतात. त्यात खुल्या गटातून निवडून येणारी महिला सदस्यांचाही समावेश असू शकतो. मात्र राज्य शासनाने आरक्षण जाहीर झाल्यापासून खुल्या गटातून आरक्षित गटातील अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापती केल्याची उदाहरणे दुर्मिळ म्हणजे नाही. यामुळे झेडपीच्या १९ गटातील निवडून येणाऱ्या सदस्यांतूनच अध्यक्ष निवडला जाईल.

जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण जाहीर

गटनिहाय आरक्षण असे
अनुसूचित जाती - (एकूण ७) 
खुला गट (तीन) - दिघंची, बेडग, ढालगाव
स्त्री राखीव (चार) - भाळवणी, वाकुर्डे बुद्रुक, बावची, लेंगरे
नागरिकांचा मागास प्रवर्ग - (एकूण १६)
खुला गट (८) - आटपाडी, पेठ, मांजर्डे, मालगाव, रेठरे हरणाक्ष, दरिबडची, येलूर, येळावी
स्त्री राखीव - (८) - दुधोंडी, तडसर, मांगले, मुचंडी, म्हैसाळ, प.त.वरुण, समडोळी, आरग 
सर्वसाधारण ( एकूण ३७)
खुला गट (१९) - कवलापूर, नागेवाडी, उमदी, सावळज, जाडर बोबलाद, चिकुर्डे, विसापूर, खरसुंडी, कुंडल, भिलवडी, चिंचणी, बोरगाव, कसबे डिग्रज, डफळापूर, कोकरुड, बागणी, मणेराजुरी, कडेपूर, अंकलखोप 
स्त्री राखीव (१८) - बिळूर, देशिंग, वाटेगाव, बुधगाव, करगणी, संख, बनाळी, शेगाव, वांगी, देवराष्ट्रे, कुची, रांजणी, कासेगाव, वाळवा, कामेरी, भोसे, एरंडोली, कवठेपिरान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT