कोल्हापूर - शहरातील खराब रस्त्यांची मंगळवारी पाहणी करताना महापौर हसीना फरास, आयुक्त पी. शिवशंकर, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, आदिल फरास, वृषाली कदम, प्रतिज्ञा निल्ले, दीपा मगदूम आदी.
कोल्हापूर - शहरातील खराब रस्त्यांची मंगळवारी पाहणी करताना महापौर हसीना फरास, आयुक्त पी. शिवशंकर, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, आदिल फरास, वृषाली कदम, प्रतिज्ञा निल्ले, दीपा मगदूम आदी. 
पश्चिम महाराष्ट्र

खड्डे पाहणीसाठी पदाधिकारी रस्त्यावर

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने महापौर हसीना फरास, आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आज खड्ड्यांची पाहणी केली. खड्डे पाहणीचा हा रोड शो शहरात चर्चेचा विषय ठरला. रस्त्यावरील खड्डे बुजवायचे काम तातडीने सुरू करा, वर्दळीच्या ठिकाणचे रस्ते करा, महापालिकेतील सगळे अभियंते या कामाला लावा, अशा सूचना महापौर हसीना फरास यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. व्हीनस कॉर्नर येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका तरुणाचा बळी गेला. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलस्वार ट्रकच्या चाकाखाली सापडला. त्यामुळे रस्त्यांच्या प्रश्‍नावर पुन्हा चर्चा झाली. आज महापौर हसीना फरास यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह रस्त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. दुपारी एक वाजता महापालिकेपासूनच फिरतीला सुरवात झाली. महापालिकेच्या वाहनांचा ताफा शहरातून फिरू लागला. महापालिकेच्या मुख्य इमारतीपासूनच पाहणीला सुरवात झाली.

बाजारगेटपासून शुक्रवार पेठेकडे गेलेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. हा रस्ताही खड्डेमय आहे. त्यानंतर पापाची तिकटी ते तोरस्कर चौक या रस्त्याची पाहणी झाली. तेथून पंचगंगा नदी घाट, पंचगंगा रोड, दुधाळी परिसर, रंकाळा स्टॅड, लक्ष्मीपुरी, धान्य बाजार, टेंबे रोड, केशवराव भोसले नाट्यगृह, वाय. पी. पोवारनगर, राजारामपुरी सिटी हॉस्पिटल आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. या वेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, नियाज खान, प्रतापसिंह जाधव, शेखर कुसाळे, ईश्‍वर परमार, प्रकाश गवंडी, सचिन खेडकर, संदीप कवाळे, उमा बनछोडे, शिवानंद बनछोडे, प्रतिज्ञा निल्ले, दीपा मगदूम,माजी नगरसेवक आदिल फरास, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, तसेच आर. के. जाधव आदी उपस्थित होते.

खराब रस्त्यांची जबाबदारी ठेकेदारांवर
खराब झालेल्या रस्त्यांची जबाबदारी संबंधित ठेकेदारांवर निश्‍चित करण्यात आली आहे. या ठेकेदारांनी ते रस्ते पुन्हा करून द्यायचे आहेत. काही रस्ते एका पावसातच धुऊन गेले आहेत. त्यामुळे पुन्हा हे रस्ते त्या ठेकेदारांनी करून द्यायचे आहेत.

वाहनांचा प्रचंड ताफा आणि नागरिकांत चर्चा
या वेळी वाहनांचा प्रचंड ताफा होता. महापौर, उपमहापौर आणि महापालिकेचे अधिकारी रस्त्यावर उतरून पाहणी करत असताना नागरिकही या वेळी तेथे येऊन अडचणी आणि समस्या सांगत होते. एकेक रस्ता कित्येक वर्षे झालेलाच नाही. रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात. कामे निकृष्ट होतात, अशा तक्रारी नागरिकांनी या वेळी केल्या.

तत्काळ पॅचवर्क करा

खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करणे जोखमीचे झाल्याने तातडीने खड्डे बुजवून घ्या, अशी सूचनाही या वेळी महापौर हसीना फरास यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT