पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात प्लास्टिकच्या कचऱ्यात तीन टनांनी घट 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - शहरातून गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यातून प्लास्टिकच्या कचऱ्यात सरासरी तीन टनांनी घट झाली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान, तब्बल 11 वर्षांनंतर पालिकेतील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी पूर्ण झाली, असेही त्यांनी सांगितले. 

सध्या शहरातून रोज सरासरी 230 ते 250 टन कचरा गोळा होतो. 23 जूनला प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली. तत्पूर्वी शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्यातून सरासरी 13 ते 14 टन कचरा हा प्लास्टिकचा असायचा. बंदीनंतर प्लास्टिक वापरायचे प्रमाण कमी झाले आहे. आता हे प्रमाण 11 टनावर आले आहे. प्लास्टिक न वापरण्याबाबत नागरिकांत जागृती झाली असून, जसजसे जागृतीचे प्रमाण वाढेल तसतसे प्लास्टिक वापरण्याचेही प्रमाण कमी होईल. पर्यायाने प्लास्टिकचा कचराही कमी होत जाईल. नागरिकांना देण्यासाठी सुमारे 72 हजार डस्टबीन उपलब्ध झाले आहेत. त्याचे वाटप सुरू आहे. स्वतंत्र डस्टबीन असल्याने नागरिकही ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करत आहेत. त्यामुळे त्याचे विलगीकरण करताना अडचण होत नाही, असेही आयुक्तांनी सांगितले. 

महापालिकेतील सेवाज्येष्ठता यादी यापूर्वी 2007 मध्ये झाली होती. त्यानंतर ती यादी झालीच नव्हती. त्यामुळे पदोन्नतीचे निर्णय थांबले होते. तब्बल अकरा वर्षानंतर यादी पूर्ण झाली आहे. आकृतिबंधाचा विषय सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे. तो मंजूर झाला की शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. त्यानंतर नव्या पदासह नियुक्‍त्या केल्या जातील. सेवाज्येष्ठता यादी पूर्ण झाल्यामुळे पदोन्नतीचे मार्गही सुकर होईल, असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT