Police Alert For Help The Girls And Women Sakal Experiment In Kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

होय, तरुणी - महिलांसाठी पोलिस आहेत सतर्क; कशावरुन ?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महिलांच्या मदतीसाठी असलेल्या हेल्पलाईनवर तातडीने प्रतिसाद मिळत आहे. 15 मिनिटांत महिलांच्या मदतीसाठी पोलिस येत आहेत. कोल्हापूर महिला पोलिस तरुणींसाठी सतर्क असल्याचा अनुभव "सकाळ'च्या टीमने केलेल्या प्रात्याक्षिक चाचणीतून पुढे आला. 

अनेक वेळा योजनांची घोषणा केली जाते. मात्र, त्या योजनेचा लाभ अनेकांना होत नाही. त्यासाठी पोलिसांनी जाहीर केलेल्या योजनेचे वास्तव तपासण्यासाठी "सकाळ'च्या टीमने ही चाचणी घेतली. सकाळची बातमीदार नंदिनी नरेवाडी यांनी तरुणी बनून मदत मागितली. मदत मिळाली आणि पोलिस दलातील आपुलकीचा हा अनुभव त्यांना आला. "सकाळ'च्या बातमीदार नंदिनीसोबत बातमीदार लुमाकांत नलवडे, राजेश मोरे व छायाचित्रकार बी. डी. चेचर यांनी या चाचणीत सहभाग घेतला. 
दिल्लीतील निर्भया आणि हैदराबाद येथील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांच्या कामाविषयी ही लोकांच्यातून प्रश्‍नचिन्ह तयार झाले आहे. 

तरुणींच्या मदतीसाठी विशेष योजना

त्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महिला पोलिस तरुणींच्या मदतीसाठी विशेष योजना जाहीर केली. कोल्हापूर पोलिसांनी मदतीसाठी हेल्पलाईनचे क्रमांक प्रसिद्ध केले. हेल्पलाईनचे क्रमांक प्रसिद्ध केल्यावर त्यावर प्रत्यक्ष खात्री करून घेण्यासाठी "सकाळ'च्या टीमने प्रयोग केला. या प्रात्याक्षिकांमध्ये तरुणी-महिलांसाठी पोलिस सतर्क असल्याचे दिसून आले आहे. "सकाळ'च्या बातमीदारांनी याचा अनुभव घेतला. 

असे होते प्रात्यक्षिक

आम्ही दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी शिवाजी उद्यमनगरातील कार्यालयातूून बाहेर पडलो. थेट शिवाजी विद्यापीठानजीकचे केएसबीपीने तयार केलेले "नेचर पार्क' गाठले. तेथून महिलांसाठी असलेल्या हेल्पलाईनला कॉल केला. आणि पुढे रोड रोमिओंच्या माध्यमातून त्रास होणाऱ्या तरुणीची सुटका केली. महिला पोलिस त्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने करतात, याचा अनुभव आला. 

एका कॉलवर पोलिस मदतीला आले धावून

आम्ही हे प्रात्यक्षिक घेताना याची कल्पना राजारामपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांना आणि महिला हेल्पलाईनच्या अधिकाऱ्यांना आलेली नाही. एका कॉलवर पोलिस महिलांना कोणकोणत्या पातळीवर मदत करतात. हे कोल्हापूर पोलिसांनी दाखवून दिले. एकंदरीतच कोल्हापूर पोलिस खरोखरच सतर्क आहेत, हे यातून दिसले असले तरी मदतीसाठीचे ठिकाण आणि पोलिस पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी पोलिसांनी विचार करण्याची गरज असल्याचे यातून दिसले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT