Police
Police 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिसांना वेध बदल्यांचे

प्रवीण जाधव

सातारा - मे महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच तीन दिवसांत निवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस जवानांना सध्या बदल्यांचे वेध लागले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या बदल्या झाल्यास सोयीचे ठरणार असल्याने ही प्रक्रिया लवकर पार पडावी, अशी पोलिसांची अपेक्षा आहे.

मे महिना हा बदल्यांचा कालावधी असतो. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी दर वर्षी या काळात काय होणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. जिल्ह्यात सुमारे २७०० कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांची शासकीय नियमानुसार बदली होत असते. 

पोलिस विभागाच्या नियमाप्रमाणे सहा वर्षे एकाच पोलिस ठाण्यात काम केलेले कर्मचारी बदलीसाठी पात्र असतात. त्याचबरोबर विनंती अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचाही अधीक्षक विचार करत असतात. कार्यकाल पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांकडून सोयीच्या बदलीच्या दृष्टीने त्यांना हव्या असलेल्या पोलिस ठाण्यांची नावे मागविली जातात. त्यानुसार ती पोलिस ठाणी देण्याचा प्राधान्याने विचार होतो. शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला या बदल्या झाल्यास कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे होते. त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा आहे. 

या वेळी पोलिस दल लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त होते. आता निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. निकालाचा व त्यानंतर काही दिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलिसांची मोठी जबाबदारी असते. मात्र, ती पार पाडल्यानंतर तातडीने बदल्यांचे गॅझेट मार्गी लागावे, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. बदलीचे ठिकाण लवकर समजले तर राहण्याचे व मुलांच्या शिक्षणाचे नियोजन करणे सोयीचे होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मागील वर्षी न सोडलेल्यांचे काय?
पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मागील वर्षी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या; परंतु या ना त्या कारणाने अनेक कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. आता दुसऱ्या बदलीचा कालावधी आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आता तरी सोडले जाणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT