पश्चिम महाराष्ट्र

वन्यप्राण्यांना हुसकावण्यासाठी आता "पोटॅटो गन' 

शिवाजी यादव

कोल्हापूर - सहा महिन्यांपूर्वी पन्हाळा - जोतिबा डोंगर वाटेने चार गवे कोल्हापूर शहराच्या हद्दीपर्यंत आले. आठ दिवस त्यांनी ठाण मांडले. वनविभागाचे कर्मचारी गव्यांना जंगलाकडे सुरक्षित पाठविण्यासाठी दिवस-रात्र राबत होते; पण गवे त्यांना दाद न देता नागरी वस्तीकडे जात होते. अखेर वनविभागाने पोटॅटो गन (बटाटा बंदूक) आणली. आठदहा "बार काढले', तशी गव्यांनी धूम ठोकली. 

कोणतीही इजा न करता, फक्त आवाजाद्वारे वन्यप्राण्यांना हुसकावणारी पोटॅटो गन वन विभागासाठी वरदान ठरली आहे. 
अशा 22 गन जिल्ह्यातील वनविभाग कार्यालयांना देण्यात येत आहेत. 

जंगल सोडून बाहेर आलेल्या वन्यप्राण्यांचा उपद्रव जंगला लगतच्या गावांत होतो. अशा वन्यप्राण्यांना सुरक्षित पुन्हा जंगलात पाठविण्यासाठी वनविभागाला कसरत करावी लागते. यावर मात करून वन्यप्राण्यांना जंगलात हुसकाविण्यासाठी वनविभागाकडे पोटॅटो गन (बटाटा बंदूक) हा पर्याय पुढे आला आहे. सातारा वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनुभव व कौशल्य पणाला लावून ही गन विकसित केली आहे. 

ही गन कोणती इजा न करता फक्त आवाज काढते आणि त्या आवाजाच्या उलट दिशेने वन्यप्राणी पळत सुटतील, अशी त्याची रचना आहे. एक ते दीड इंचाची पीव्हीसी पाइपची नळी दोन फूट उंचीची आहे. खालील बाजूला एक नोजल आहे, त्याला झाकण व मागील बाजूने चाप असे जोडकाम आहे. या पाईपच्या तोंडातून एक बटाटा आत सोडायचा, नोजलमधून विशिष्ट गॅस सोडायचा. हवा व गॅस यांच्या मिश्रणातून नळीत दाब तयार होतो, तेव्हा चाप ओढला, की बटाटा बंदुकीतून उडतो. बंदुकीची गोळी सुटल्याप्रमाणे मोठा आवाज होतो. त्याला घाबरून प्राणी पळतात. 

केवळ दोन-अडीचशे रुपये खर्च 
केवळ दोन-अडीचशे रुपये उत्पादनखर्चात बंदूक तयार केली आहे. वन्यजीव रेस्क्‍यू व्हॅनचे उद्‌घाटन झाले. तेव्हा या बंदुकीचे प्रात्यक्षिक दाखविले. कोल्हापुरात सहा महिन्यांपूर्वी गवे आले होते, त्यांना हुसकावण्यासाठी याच गनचा वापर झाला होता. गवे पळाले होते, त्यानंतर ही गन मागविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. उपवनसरंक्षक हनुमंत धुमाळ यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील वनविभागाच्या सर्व कार्यालयांकडे प्रत्येकी दोन गन देण्यात येणार आहेत. 

""वन्यप्राण्याला कोणतीही इजा न करता, परिणाम देणारी ही गन आहे. माकडांपासून गव्यांपर्यंतचे अनेक वन्यप्राणी जंगलाबाहेर येतात. तेव्हा त्यांना हुसकाविण्यासाठी या गनचा वापर होईल. वन्यजीव रेस्क्‍यू व्हॅनसह वनविभागाच्या कार्यालयाकडे पोटॅटो गन यापुढील काळात उपलब्ध होणार आहे.'' 
- इंद्रजित निकम,
भरारी पथक, वनविभाग.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT