Prabhakar Deshmukh on Green Mandesh issue
Prabhakar Deshmukh on Green Mandesh issue 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रीन माणदेशचे स्वप्न सत्यात उतरवू :  प्रभाकर देशमुख 

सकाळवृत्तसेवा

मलवडी : ग्रीन माणदेश हे आपण सर्वांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी झाडे लावून ते जगविण्याचा आपण विडा उचलू या. शाश्वत विकासाच्या दिशेने सुरु असलेल्या माणच्या वाटचालीमध्ये ग्रीन माणदेश हे महत्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.

माण-खटाव तालुके हरित बनवून दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी 'ग्रीन माणदेश' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व संवर्धन कार्यशाळा आज दहिवडी येथील डी. एस. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

देशमुख म्हणाले, की झाडे लावताना त्यांचे पर्यावरणदृष्ट्या महत्व समजून उमजून लावावीत. पाणी आणी झाडे हे आपले भविष्य उज्वल करु शकतात. जलयुक्त शिवार ही माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेत माण-खटावमध्ये अभिमान वाटावे असे काम झाले आहे. महाराष्ट्रसह माणचे नशिब बदलणारे हे काम आहे. ग्रीन माणदेश योजनेत आम्ही झाडे उपलब्ध करुन देणार आहोत. त्याची जोपासना ग्रामस्थांनी करायची आहे.

पर्यावरण तज्ञ महेश गायकवाड म्हणाले, की आपण जलसंधारणाची खूप काम केली आहेत. आता गरज आहे, ती वृक्षारोपणाची. त्यापूर्वी चराईबंदी करुन गवत वाढविण्याचा प्रयत्न करावा. सुदृढ व देशी रोपांची निवड लागवडीसाठी करावी. ज्या झाडांच्या पान, फूल, फळ याचा आपल्याला उपयोग होईल. अशाच झाडांची रोपे लावा. ग्रीन माणदेश हा उपक्रम सक्षमपणे राबविला तर नक्कीच माणचा चेहरामोहरा बदलेल.

वनक्षेत्रपाल एस. के. पाटील म्हणाले, की 1 जुलैपासून तेरा कोटी वृक्ष लागवड हा उपक्रम सुरु होत आहे. जलसंधारणाची कामे केली. तरी वृक्षारोपण केल्याशिवाय पर्याय नाही. यावेळी उपसचिव डाॅ. प्रमोद शिंदे, ड्रिम सोशल फाऊंडेशनच्या हर्षदा जाधव-देशमुख, वन क्षेत्रपाल एस. के. पाटील, सामाजिक वनीकरणच्या वन क्षेत्रपाल कौसल्या भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. देवराईचे महाराष्ट्र समन्वयक योगेश गायकवाड यांनी देवराईबद्दल माहिती दिली. किरकसालचे सरपंच अमोल काटकर यांनी कार्यशाळेची संकल्पना 'चला फेडू, या मातीचे ऋण, चला करुया ग्रीन माणदेश' अशा शब्दांत विशद केली.

या कार्यक्रमास तहसीलदार दशरथ काळे, माजी सभापती श्रीराम पाटील, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर व तानाजी कट्टे, माजी उपसभापती वसंतराव जगताप, भाजपचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, भारतीय जैन संघटनेचे भरतेशशेठ गांधी, युवराज सुर्यवंशी, अभयसिंह जगताप, सुनिल बाबर, विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहिवडीचे नगरसेवक अजित पवार यांनी प्रास्ताविक केले. माणदेश फाऊंडेशन पुणेचे अध्यक्ष अशोक माने यांनी स्वागत केले तर कार्याध्यक्ष प्रविण काळे यांनी  आभार मानले. हणमंत जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT