New Year Celebration
New Year Celebration esakal
पश्चिम महाराष्ट्र

ढाबे, हॉटेल खवय्यांसाठी सज्ज; 'थर्टी फस्ट' अन् नव्या वर्षाची जय्यत तयारी, तरुणाईचा उत्साह शिगेला

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी पहाटे पाचपर्यंत बार सुरू राहणार आहेत, तर वाईनशॉप चालकांना रात्री एकपर्यंत विक्री करता येणार आहे.

सांगली : तरुणाईच्या उत्साहाला निमित्त लागते. ‘थर्टी फस्ट’ला (31st December Party) तो दिवस साधला जातो. जोडूनच नववर्षाचे स्वागत केले जाते. सद्यःस्थितीत याला उत्सवाचे स्वरूप आले आहे. हेच ‘कॅश’ करण्यासाठी हॉटेल, भोजनालये सज्ज झाली आहेत. हॉटेल चालकांनी मेन्यूसोबत लाईव्ह संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आकर्षक रोषणाई करत हॉटेल सजवली असून थर्टी फस्टसाठी खास ऑफरचे फलक देखील लावण्यात आले आहेत.

सांगली-कोल्हापूर रोडवरील (Sangli-Kolhapur Road) ‘के-लाऊंज’मध्ये नव्या वर्षाच्या जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. विश्रामबाग येथील ‘हॉटेल ४ रेस्टॉरंट’मध्ये फोमो रेस्टॉरंट सुरू करण्यात आले असून व्हेज, नॉनव्हेजसह कॉकटेल, मॉकटेल सेवा उपलब्ध आहेत. याठिकाणी लाईव्ह संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बायपास रोडवर ‘हॉटेल रायबा’मध्ये कोल्हापुरी पद्धतीचा चुलीवरील तांबडा, पांढरा रस्सा ही हॉटेलची खासियत असणार आहे.

लिमये मळ्यातील उत्कर्षा बारमध्ये थर्टी फस्टसाठी व्हेज, नॉनव्हेज, चायनीज पदार्थ उपलब्ध आहेत. फॅमिलीसाठी खास वेगळी व्यवस्था केली आहे. आयकर रोडवरील हॉटेल देवगिरीमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार आहे. राजस जेवणासाठी हरभट रोडवरील दूर्वांकुर थाळी, मारुती रोडवरील उत्कर्ष भोजनालय, विजयनगर येथील क्रांती भोजनालय सज्ज झाले आहे. जेवणानंतर पान खायला देखील गर्दी होत असते. त्यांचीही जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यात हजारांवर ढाबे, हॉटेल आहेत, तर २७० बार आहेत. या वर्षी बुकिंगचे प्रमाण कमी असल्याचे खाद्य विक्रेता चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष लहू बडेकर यांनी सांगितले.

पहाटे पाचपर्यंत बार सुरू

सोमवारी (ता. ३१) पहाटे पाचपर्यंत बार सुरू राहणार आहेत, तर वाईनशॉप चालकांना रात्री एकपर्यंत विक्री करता येणार आहे. भेसळीची दारू रोखणे, तसेच परराज्यांतून येणाऱ्या दारू तस्करांवर कारवाई करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. ३१ डिसेंबरसाठी दारू परवाना पाच रुपयांत बारमालकांकडेच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात येणार आहे. नववर्षाचे स्वागत जल्लोषात व्हावे, मात्र यावेळी समाजभान ठेवून प्रत्येकाची वर्तणुक हवी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

-डॉ. बसवराज तेली, पोलिस अधीक्षक, सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT