Sindhudurg Police : 'थर्टी फर्स्ट'वर पोलिसांची करडी नजर; पर्यटनस्थळांसह समुद्र किनाऱ्यांवर कडक बंदोबस्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व समुद्र किनारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
31st December Celebration Party Sindhudurg Police
31st December Celebration Party Sindhudurg Policeesakal
Summary

नववर्षाचे स्वागत आनंदाने साजरे करावे, याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

ओरोस : ‘थर्टी फर्स्ट’च्या (31st December Party) पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस (Sindhudurg Police) सतर्क झाले असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी ३ पोलिस उपअधीक्षक, १२ पोलिस निरीक्षक, ३० सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि २०० पोलिस अंमलदार असा बंदोबस्त तैनात केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल (Superintendent of Police Saurabh Kumar Aggarwal) यांनी दिली.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी म्हटले आहे की, २०२३ या सरत्या वर्षाला निरोप व २०२४ नूतन वर्षाचे स्वागत या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘जेएन १’ नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका विचारात घेऊन आयोजकांनी व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने व इतर सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुन नववर्ष स्वागत करावे, असे आवाहन केले आहे.

31st December Celebration Party Sindhudurg Police
New Year 2024 : नववर्षाच्या स्‍वागतासाठी शिवारातील मेजवानीला पसंती; गावरान कोंबड्यांच्‍या मागणीत मोठी वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व समुद्र किनारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बाहेरून येणारे पर्यटक खासगी वाहनांनी येत असल्याने रस्त्यांवर नेहमीपेक्षा वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यात वाहतुकीच्या नियमांचे पालन न झाल्यामुळे अपघात होतात. पर्यटकांनी त्यांचे कुटुंब, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती यांची विशेष दक्षता घेऊन सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन होण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा व स्थानिक पोलोस यांच्याकडून बारकाईने लक्ष पुरवून कायद्याचे उल्लंघन करण्याऱ्या व विशेषतः मद्यपी चालकांविरुदध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत.

शाळा, कॉलेज, अॅकॅडमी यांच्याकडून सहलींचे नियोजन करणाऱ्या आयोजकांनी पर्यटनस्थळी विशेषतः समुद्र किनारी काळजीपूर्वक व सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असेही म्हटले आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटनस्थळी, समुद्र किनारी, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केलेल्या ठिकाणी सर्व पोलिस ठाणी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हा विशेष शाखा, सागरी सुरक्षा विभाग यांची विविध पथके गणवेषात व खासगी गणवेषात तैनात आहेत.

31st December Celebration Party Sindhudurg Police
म. ए. समितीचा विरोध डावलून कन्नड संघटनांच्या दबावापुढं महापालिका झुकली; मराठी-इंग्रजी भाषेतील हटविले होर्डिंग्ज

हॉटेल, लॉज, होम स्टे आदींची तपासणी करून अवैध धंदे व बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महिला पोलिस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

अवैध वाहतुकीवर कारवाईचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी व पोलिस दूरक्षेत्रांवर नाकाबंदीचे नियोजन केले आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिस अधिकारी व अंमलदार यांची कुमक वाढविण्यात आलेली असून, कोणत्याही प्रकारची अवैध वाहतूक दिसून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

31st December Celebration Party Sindhudurg Police
कामगारांच्या डोक्यावरील ओझं होणार कमी; सिंधुदुर्गातील नववीच्या विद्यार्थ्यांनी बनवलं खास 'उपकरण', काय आहे खासियत?

सावधान! कॅमेऱ्याचीही नजर!

नववर्षाचे स्वागत आनंदाने साजरे करावे, याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. संपूर्ण बंदोबस्ताकरिता ३ पोलिस उपअधीक्षक, १२ पोलिस निरीक्षक, ३० सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि २०० पोलिस अंमलदार असा बंदोबस्त तैनात आहे. बंदोबस्तादरम्यान पोलिसांकडून व्हिडिओग्राफीही करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com