student
student 
पश्चिम महाराष्ट्र

मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना कातडी पट्ट्याने मारहाण

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : तालुक्यातील पाटकळ येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर येथे जयंतीनंतर फोटोवरील हार काढल्याच्या कारणावरून नववीतील दोन विद्यार्थ्यांना अंगावर व्रण उमटेपर्यंत कातडी पट्ट्याने बेदम चोप दिल्याने संतप्त झालेल्या पालकांनी येथील विद्यालयास कुलूप ठोकत मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केल्याने संस्था या प्रकरणात कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले.

याबाबत अधिक माहिती अशी की शाहू शिक्षण संस्थेच्या  शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाल्यानंतर  फोटो शाळेत नेण्याचे काम शिपायाऐवजी विद्यार्थी नेताना त्या फोटोवरील हार खाली पडून पुन्हा फोटोला घातल्याने मुख्याध्यापक संतप्त होवून आज  प्रतीक विठ्ठल ताड व महेंद्र दत्तात्रय डांगे या दोन नववी तील विध्यार्थ्याना कातडी पट्ट्याने बेदम मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवर हातावर व्रण उमटले.सदर मुख्याध्यापकाने त्या दोन विद्यार्थ्यांकडून हार पडल्याने माझी चूक झाली पुन्हा अशी चूक करणार नाही असे लिहून घेतले व पालकांनी विचारल्यास सायकलवरून पडल्याचे सांगावयास सांगीतल्याने भीतीपोटी विद्यार्थ्यांनी घरी सांगितले नाही पण पालकांना मुलाच्या अंगावर वळ दिसल्याने हा प्रकार उजेडात आला. आज दि 18 रोजी पालकांसह गावातील ग्रामस्थानी शाळेत जाऊन जाब विचारत शाळेस कुलूप ठोकत मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली.

कार्यक्रम दरम्यान हा प्रकार घडला असता तर शाळेवर कारवाई ची मागणी झाली असती विद्यार्थीनी फोटोतील हार टाकत महापुरूषाचा अवमान केला.त्यांना शासन करताना मी रागात मी जास्तच मारले.माझी चुक मान्य करतो.
- सुभाष मोटे, प्राचार्य  शारदा सिध्दनाथ विद्यालय पाठखळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT