पश्चिम महाराष्ट्र

दुष्काळापासून जनतेचे रक्षण कर - उदयनराजे 

सकाळवृत्तसेवा

सातारा - नवरात्रोत्सवानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राजघराण्याचे कुलदैवत असलेल्या प्रतापगडावरील भवानीमातेचे दर्शन घेत आरती केली. दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती महाराष्ट्रातील जनतेला दे. दुष्काळात कोणीही आत्महत्या करू नये. काहीही करून पाऊस पडू देत... असे साकडेही त्यांनी भवानीमातेच्या चरणी घातले. 

सध्या सातारा लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी व उदयनराजे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. उदयनराजेंनी कालच (ता. 15) जलमंदिर या निवासस्थानी समर्थकांची बैठक घेऊन आगामी वाटचालीबाबत चर्चा केली. आज त्यांनी प्रतापगडावर जाऊन भवानीमातेचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत त्यांचे समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते. भवानीमातेची आरती त्यांच्या हस्ते झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रत्येक वर्षी मी प्रतापगडावर भवानीमातेच्या दर्शनासाठी येतो. या वेळेसही आलो आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने या वर्षीच्या दुष्काळ भीषण असेल. या परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती महाराष्ट्रातील जनतेला दे. दुष्काळी स्थितीमुळे कोणीही आत्महत्या करू नये. काहीही करून पाऊस पडू देत, असे साकडे भवानीमातेच्या चरणी घातल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी साताऱ्याचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, ऍड. दत्तात्रय बनकर, जितेंद्र खानविलकर, विकास शिंदे, दिलीप गवळी, समीर माने उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT